Sadashiv Lokhande sakal
अहमदनगर

Sadashiv Lokhande : CM शिंदेंच्या सोबत गेल्यामुळे पराभूत झालो हे खरं नाही... माजी खासदाराने सांगितलं पराभवाचे कारण

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी - पराभवाचे दुःख नाही. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचा आनंद आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात मी जे पेरले ते चांगले उगवले. मात्र, उगवलेले पीक काढण्यात मी कमी पडलो. माझ्या पराभवाला मीच जबाबदार आहे. मी कमी पडलो. मला कुणालाही दोष द्यायचा नाही. खासदार भाऊसाहेब वाकचौरेंना माझ्या शुभेच्छा, अशा शब्दांत माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

लोखंडे यांनी आज येथे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळावा आयोजित करून या सर्वांचे आभार मानले. त्यावेळी ते बोलत होते. कमलाकर कोते, नितीन औताडे, बाबासाहेब कोते, नितीन कापसे, कैलास वाकचौरे, अविनाश आदिक, भगीरथ होन, नानासाहेब शेळके, विठ्ठल घोरपडे, रावसाहेब थोरात, कैलास बोर्डे, बाबा शिंदे, राजेश लुटे, विमल पुंडे, मीनाक्षी वाकचौरे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

लोखंडे म्हणाले की, सर्व विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी आमदारांनी माझ्या प्रचारासाठी पुढाकार घेतला. कदाचित मतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मला चांगली साथ मिळाली. कार्यकर्त्यांनी झटून काम केले. निवडणूक निकालात मला सहापैकी चार विधानसभा मतदारसंघांत आघाडी आहे.

निळवंडे पट्ट्यात आणखी मते मिळाली असती. मात्र, आमच्या ताब्यात संस्था नाहीत. तेथेही आम्ही कमी पडलो. मला याबाबत कुणालाही दोष द्यायचा नाही. या मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मी यापुढेही सक्रिय राहीन. पश्चिमेचे पाणी पूर्वेला आणण्याचे काम फक्त डबल इंजिन सरकारच करू शकते.

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलो हे माझ्या पराभवाचे कारण नाही. त्यांची मला मोलाची व खंबीर साथ लाभली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील माझ्या प्रचारात मोलाची साथ दिली. महायुतीच्या सर्व आजी-माजी आमदारांनी चांगले काम केले.

- सदाशिव लोखंडे, माजी खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT