Shirdi Sai Baba Temple esakal
अहिल्यानगर

Shirdi Sai Baba Temple : शिर्डीमधील साई बाबांच्या मंदिराचे महत्व काय? घ्या जाणून

साईबाबांनी शिर्डीमध्ये ६० वर्षे राहून मानवजातीची सेवा केली होती.

Monika Lonkar –Kumbhar

Shirdi Sai Baba Temple : महाराष्ट्रातील अहमदनर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डीमध्ये साईबाबांचे मंदिर आहे. या शिर्डीमध्ये साईबाबांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना 'शिर्डीचे साईबाबा' असे ओळखले जाते. साईबाबांनी शिर्डीमध्ये ६० वर्षे राहून मानवजातीची सेवा केली होती. येथूनच जगाला मानवता, कल्याण आणि एकात्मतेची अमूल्य शिकवण साईबाबांनी दिली. साईबाबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र दिला होता.

शिर्डीचे देवस्थान हे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. साई बाबांचा जन्म १९ व्या शतकाच्या सुरूवातीला झाला होता, असे मानले जाते. साई बाबांनी त्यांचे बहुतेक आयुष्य हे शिर्डीमध्ये घालवले होते.

साई बाबांच्या शिकवणीमध्ये सर्व धमांच्या तत्वज्ञानाचे मिश्रण होते. ज्यामध्ये सर्व धर्मांच्या एकतेवर, निस्वार्थ सेवा, दान आणि प्रेमाचे महत्व यावर भर देण्यात आला होता. त्यांच्या चमत्कारिक कृत्यांमुळे आणि सखोल ज्ञानामुळे साईबाबांची किर्ती सर्वदूर पोहचली.

शिर्डीचे हे मंदिर साईबाबांना समर्पित असून हे हिंदूंचे महत्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. दरवर्षी लाखो भाविक या मंदिराला भेट देतात. या मंदिराचा समृद्ध इतिहास, प्रभावी वास्तुकला आणि मंदिराचे धार्मिक महत्व यासाठी हे तीर्थक्षेत्र ओळखले जाते. आज आपण शिर्डीच्या साई बाबांच्या मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत.

शिर्डीच्या साई बाबांच्या मंदिराचे महत्व काय ?

शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराची निर्मिती १९२२ मध्ये करण्यात आल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या स्थापत्य कलेबद्दल बोलायचे झाल्यास मंदिराच्या स्थापत्य कलेमध्ये हिंदू आणि इस्लामिक शैलींचा मिलाप आढळून येतो. ही वास्तुकला साईबाबांनी आयुष्यभर उपदेश केलेल्या एकतेचे प्रतिक आहे.

साई बाबांच्या मुख्य मंदिरातील गाभारा हा सोन्याने मढवला असून मंदिराचा कळस देखील सोन्याचा आहे. साई बाबांच्या मुख्य मंदिरात साईबाबांची एक आजीवन संगमरवरी मूर्ती आहे. ही मूर्ती ध्यानस्थ मुद्रेमध्ये बसली असून मूर्तीचा उजवा हात हा आशीर्वादासाठी आणि डावा हात मांडीवर आहे.

साईबाबांची ही प्रसन्न मूर्ती वस्त्रांनी आणि दागिन्यांनी सजलेली आहे. या मंदिराच्या गर्भगृहात भक्ती, शांतता आणि प्रसन्नतेचे वातावरण आहे. या मंदिरात विविध विभाग आहेत. समाधी मंदिर, प्रार्थना आणि दर्शनासाठी प्रशस्त सभामंडप आणि सामूहिक पूजा आणि भजनासाठी एक हॉल आहे. यासोबतच एक प्रार्थना कक्ष देखील आहे.

सबका मालिक एक

साई बाबांनी ‘सबका मालिक एक है’ असा संदेश भक्तांना दिला होता. शिर्डीचे साई मंदिर हे साईबाबांनी दिलेली शिकवण आणि त्यांच्या चमत्कारिक घटनांसाठी ओळखले जाते. मात्र, यासोबतच या मंदिराची गणना जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये केली जाते.

दर गुरुवारी शिर्डीमध्ये साईबाबांची पालखी निघते. या पालखीमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची रखडलेली कामे, दु:खे दूर होतात असे मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

SCROLL FOR NEXT