Nagar mahapalika 
अहिल्यानगर

राष्ट्रवादी-शिवसेनेचं ठरलं; शेंडगे महापौर, भोसले उपमहापौर

सकाळ डिजिटल टीम

नगर ः नगर महापालिकेतील महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकांचे सत्र झाले. यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित सत्ता संपादन करण्याचे निश्‍चित झाले. तसेच शिवसेनेच्या वाट्याला महापौरपद, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला उपमहापौरपद मिळाले आहे.

शिवसेनेचा एक गट घेऊन आमदार संग्राम जगताप व नगरसेवक अनिल शिंदे यांनी नवीन समीकरण महापालिकेत मांडले आहे. महापौरपदासाठी रोहिणी शेंडगे, तर उपमहापौरपदासाठी गणेश भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. आता सध्या भारतीय जनता पक्षाचा महापौर आहे. तोही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर. शिवसेनेकडे संख्याबळ जास्त असतानाही राष्ट्रवादीमुळे भाजपला संधी मिळाली होती. आता महाविकास आघाडीमुळे तो धर्म पाळावा लागत आहे.

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या निधनानंतर शिवसेनेत दोन गट प्रकर्षाने दिसून आले. याचाच फायदा घेत आमदार संग्राम जगताप यांनी त्यांना वैयक्तिक विरोध न करणाऱ्या शिवसेनेच्या एका गटाशी सौख्य निर्माण केले. यातच शिवसेनेकडे सर्वाधिक नगरसेवक व अनुसूचित जाती महिला तीन नगरसेवक आहेत. त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही गट महापौरपद मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र नगरसेवक अनिल शिंदे यांच्या गटाने शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांनाच महापौर करण्यासाठी वरिष्ठ पातळीसह आमदार संग्राम जगताप यांच्याकडे प्रयत्न सुरू केले.

आमदार संग्राम जगताप यांच्याशी तीव्र विरोध असलेल्या गटाला दूर करत शिवसेनेला महापौर, तर राष्ट्रवादीला उपमहापौरपद देण्यावर सहमत झाले. त्यानुसार शिवसेनेचा गट व आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री पवार व मंत्री शिंदे यांच्या बैठकीतही उपस्थित राहून या नवीन समीकरणावर शिक्कामोर्तब केले. त्याच वेळी शिवसेनेचा दुसरा गट भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या संपर्कात होता, अशी चर्चा महापालिकेत आहे.

या नवीन समीकरणामुळे भाजपला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. आमदार जगताप यांच्या मर्जीतीलच व्यक्तीला विरोधी पक्षनेतेपद मिळणार असल्याची चर्चा आहे. बसप व काँग्रेसमध्ये सभागृह नेते व महिला बालकल्याण सभापतिपदाची विभागणी होण्याची शक्यता आहे.

प्रतीक्षा निवडणूक कार्यक्रमाची

नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी महापौर व उपमहापौर निवडणुकीची तारीख निश्‍चित केली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. मात्र आज जिल्हाधिकारी नगर शहरात नव्हते. त्यामुळे अजून निवडणुकीचा कार्यक्रम निश्‍चित झाला नाही. उद्या (गुरुवारी) निवडणूक कार्यक्रम निश्‍चित होण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन सर्वसाधारण सभेचा घाट

स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी २५ जूनला स्थायी समितीची ऑनलाइन सभा दुपारी बारा वाजता आयोजित केली आहे. महापालिकेत महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या हालचाली वेगात सुरू आहेत. महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळही ३० जूनला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर वाकळे यांनी त्यांच्या कार्यकाळातील शेवटची सर्वसाधारण सभा २५ जूनलाच दुपारी एक वाजता बोलावले आहे म्हणजेच एकाच दिवशी महापालिकेत दोन ऑनलाइन सभा होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Vidhan Sabha Election 2024 : धुळे जिल्ह्यात बंडखोरांकडून आव्हान उभे; पाचही मतदारसंघांत मतविभाजनाचे डावपेच

Meesho: आता टी-शर्टवर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो... मीशोवर नेटकऱ्यांचा संताप! कंपनीनं काय दिलं स्पष्टीकरण?

Kartiki Yatra : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू राहणार

अखेर भुलभुलैय्या 3 ने सिंघम अगेनला टाकलं मागे; बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये कार्तिकच ठरला अजयपेक्षा सरस

Nashik Vidhan Sabha Election : बंडखोरांच्या तलवारी म्यान; बहुतांश बहुरंगी लढती

SCROLL FOR NEXT