Shivsena sakal
अहिल्यानगर

Shivsena: विखेंच्या हमीने लोखंडे हॅट्‌ट्रिक साधणार; श्रीकांत शिंदे यांचे प्रतिपादन

सकाळ डिजिटल टीम

Shivsena: मागील ३३ वर्षे राजकारणात असलेल्या खासदार सदाशिव लोखंडे यांनी आमदारकीची हॅट्‌ट्रिक साधली. तसेच खासदार डॉ. सुजय विखे यांनी त्यांची हमी घेतल्याने ते आता खासदारकीची देखील हॅट्‌ट्रिक करतील, असा विश्वास कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

खासदार लोखंडे यांचा अभीष्टचिंतन सोहळा, तसेच मुख्यमंत्री वयोश्री व नारिशक्ती योजनांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे होते.

यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, माजी आमदार चंद्रशेखर कदम, बाळासाहेब मुरकुटे, आमदार डॉ. किरण लहामटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, महंत रामगिरी महाराज, महंत अरुणनाथगिरी महाराज, संपर्क प्रमुख बाजीराव दराडे, जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, विजय वहाडणे, सिद्धार्थ मुरकुटे, प्रकाश चित्ते, डॉ. चेतन लोखंडे आदी उपस्थित होते.

खासदार शिंदे म्हणाले की, गेल्या पन्नास वर्षांपासून रखडलेल्या निळवंडेचा प्रश्न खासदार लोखंडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे व सर्वांच्या सहकार्याने निकाली निघाला. त्यामुळे लाखो लोकांना पिण्याचे तसेच शेतीचे पाणी मिळाले. दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा आपले काम करत राहिल्याचा फायदा लोखंडे यांना झाला. सत्तेत आल्यापासून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी सातत्याने प्रयत्न केला. त्यामुळे या सरकारवर विश्वास वाढत आहे.

महसूलमंत्री विखे म्हणाले की, खासदार लोखंडे यांनी समर्पित भावनेने काम केले. कामाची धडपड आणि आवड असेल तर जनसामान्य जनता ही राजकीय नेतृत्व घडवू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे खासदार लोखंडे आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मिशन ४५ ला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्याला राज्यातून ४५ खासदार दिल्लीत पाठवायचे आहेत. त्यात आपले हे खासदारही असतील. प्रास्ताविक कमलाकर कोते यांनी केले. स्वागत डॉ. चेतन लोखंडे यांनी केले.

मतदारसंघातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहिलो. निळवंडेचे पाणी आणले. तसेच आता घाटमाथ्यावरील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून शेतकऱ्यांना सुखी करण्याचे आपले स्वप्न आहे. विखे कुटुंबाचे माझ्यावर नेहमीच प्रेम राहिलेले आहे.

- सदाशिव लोखंडे, खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT