Shrigonda Assembly Election 2024 candidate survey political
Shrigonda Assembly Election 2024 candidate survey political Sakal
अहमदनगर

Shrigonda Assembly Election 2024 : विधानसभेचे इच्छुक अलर्ट, सर्वेक्षण सुरू; श्रीगोंद्यात इच्छुकांची वाढली धाकधूक

सकाळ वृत्तसेवा

- समीरण बा. नागवडे

श्रीगोंदे : श्रीगोंदे-नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या मोठी आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला ‘धडा’ लक्षात घेत बहुतेक इच्छुक ‘अलर्ट’ झाले आहेत. मतदारांचा कल जाणून घेण्यासाठी त्यांनी स्वत:च्या यंत्रणेमार्फत सर्वेक्षण सुरू केली आहेत.

विधानसभा निवडणूक जेमतेम चार महिन्यांवर येवून ठेपली आहे. त्यादृष्टीने इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विधानसभेच्या आखाड्यात नशिब अजमावण्याची तयारी करणाऱ्यांमध्ये युतीतर्फे भाजपचे आमदार बबनराव पाचपुते व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनुराधा नागवडे,

तर आघाडीतर्फे शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप, काँग्रेस नेते घन:शाम शेलार, शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय बाजार समिती संघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा, राज्य पणन संघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब शेलार, सुवर्णा पाचपुते, टिळक भोस, भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र म्हस्के हे ही विधानसभेत जाण्याची छुपी मनिषा बाळगून आहेत.

त्यादृष्टीने इच्छुकांनी निवडणुकीची जोरदार पूर्वतयारी सुरु केली आहे. इच्छुकांचा जनसंपर्क आता कमालीचा वाढला असून सामान्य जनता ''तारे जमीं पर''चा अनुभव घेत आहे. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सर्वच नेत्यांना ''अलर्ट'' दिला आहे. त्यामुळे राज्यपातळीवर राजकीय पक्षांनी मतदारसंघाच्या सर्वेक्षण करण्याच्या धर्तीवर या नेत्यांनी आता स्वत:ची यंत्रणा ''अलर्ट'' केली आहे.

आपल्या यंत्रणेमार्फत मतदारसंघात सर्वेक्षणाचा धडाका सुरु केला आहे. यंत्रणेच्या गटवार बैठका घेवून त्यांना सर्वेक्षणासाठी प्रश्नावलीही तयार करुन देण्यात आली आहे. घाई गडबडीने तयार केलेल्या या प्रश्नावलीत काही मजेदार तर काही सर्वार्थाने निरोपयोगी प्रश्नही आहेत.

‘अहवाल’ देताना कसरत

मतदारसंघातील वाड्या, वस्त्या, वसाहतींमध्ये जावून ‘लोकभावना’ जाणून घेण्याची धडपड यंत्रणेला करावी लागत आहे. नेत्यांनी ‘कामा’ला लावलेल्या यंत्रणेत नेत्यांच्या अधिपत्याखालील संस्थांमधील कर्मचाऱ्यांचाच भरणा असल्याने या यंत्रणेवर अधिक दडपण आहे.

अनेक ठिकाणचा ''अहवाल'' देताना यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे. या यंत्रणेवर देखरेख करणारी यंत्रणाही तयार करण्यात आली असून केलेल्या कामाचा नियमित आढावा घेतला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai, Pune School Closed: मुंबई, पुण्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Jasprit Bumrah Video: फुलांची उधळण अन् आईनं आनंदानं धरलेला ठेका, विश्वविजेत्या बुमराहचं घरी जल्लोषात स्वागत

Suyash Tilak :  ‘मुलांच्या हातात मोबाईल देताय तर, किमान इतकं करा’ सुयश टिळकचा पालकांना सल्ला

Lice Outbreaks Selfies: सेल्फीमुळं डोक्यात उवांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतंय; अभ्यासातील धक्कादायक निष्कर्ष

Maharashtra News Updates : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT