EVM Machine Sakal
अहिल्यानगर

Ahmednagar EVM Security : ‘ईव्हीएम’च्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय यंत्रणा; जिल्हाधिकारी सालीमठ

सकाळ वृत्तसेवा

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षा कक्षाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याबाबत कोणतीही कमतरता राहिलेली नाही.

त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा नियमानुसार कार्यरत असून सर्व सुरक्षारक्षक कर्तव्यावर दक्ष असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी दिली. अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नीलेश ज्ञानदेव लंके यांच्या एक्‍स या सोशल मीडिया अकाउंटवरून प्रसारित झालेल्या सुरक्षा कक्षाच्या सीसीटीव्ही व्हिडिओबाबत वस्तुस्थिती मांडताना जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती ही निवडणूक प्रशासनाकडून विहित नियमानुसार नियुक्त करण्यात आलेली सीसीटीव्ही पुरवठादार आहे. या पुरवठादाराशी झालेल्या करारनाम्यानुसार सीसीटीव्ही व अनुषंगिक उपकरणे वेळोवेळी तपासून त्या सुस्थितीत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी आहे.

लोकसभा मतदार संघांच्या ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षा कक्षाच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही, तसेच सुरक्षा व्यवस्थेची दैनंदिन देखरेख करण्याकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अहमदनगर यांच्या ६ मे २०२४ व १७ मे २०२४ च्या आदेशानुसार जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

या आदेशानुसार ता. २१ मे २०२४ रोजी सायंकाळी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत राहुल शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना ता. २१ मे २०२४ रोजी सायंकाळी ७:५४ वाजता मतमोजणी हॉलच्या एका कॅमेऱ्याचे लूज कनेक्शन असल्याचे निदर्शनास आले होते.

त्यानुसार त्यांनी सायंकाळी ८:१५ वाजता सदर पुरवठादार अजिनाथ शिवाजी मुळे, स्वामी एन्टरप्रायझेस यांना सीसीटीव्ही व अनुषंगिक उपकरणांची तपासणी करण्याकरिता कळविले होते. त्यानुसार सदर पुरवठादार यांनी तिथे उपस्थित असलेल्या सीआरपीएफ सुरक्षारक्षकांना याबाबत पूर्वकल्पना दिली होती.

सुरक्षा रक्षकांच्या नोंदवहीत नोंद

सीआरपीएफ सुरक्षा रक्षकांच्या नोंदवहीमध्ये प्रवेश करण्याबाबत सायंकाळी ८:२० वाजता नोंद केली होती. त्यानंतर दोन सीआरपीएफ सुरक्षा रक्षकांसोबत वरील सीसीटीव्ही पुरवठादार यांनी मतमोजणी हॉलच्या कॅमेऱ्याची तपासणी केली होती. त्यानंतर सायंकाळी ८:२५ वाजता तिथून निघताना पुन्हा सीआरपीएफ सुरक्षा रक्षकांच्या नोंदवहीमध्ये नोंद केली होती. अहमदनगर लोकसभा मतदार संघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षा कक्षाचे कोणतेही कॅमेरे नादुरुस्त नसून ते सुरळीतपणे काम करीत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT