A special meeting has been organized in Shrirampur Municipality today 
अहिल्यानगर

श्रीरामपूर पालिकेत आज विशेष सभेचे आयोजन

गौरव साळुंखे

श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील नगरपालिकेत आज सकाळी साडे आकरा वाजेच्या सुमारात सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. या संदर्भात पालिकेने सर्व सभासद नगरसेवकांना नोटीसा पाठवून सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभेत सर्वांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक केले असून नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विशेष सर्वसाधारण सभेला सर्व सभासद नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले आहे.

दरम्यान सभेमध्ये नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन ठेक्याच्या निविदा प्रक्रियेबाबत चर्चा होणार असल्याने सभा महत्वपूर्ण ठरणार असल्याची शक्यता आहे. ऐन दिवाळीच्या काळात पालिकेच्या स्वच्छतेच्या कामांच्या संबंधित ठेकेदाराने ठेका परवडत नसल्याचे कारण देत काम सोडून पळ काढल्याने शहर स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे पालिकेने आरोग्य विभागाच्या कर्मचारी वर्गासह काही कंत्राटी कामगारांना हाताशी धरुन शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतू शहर परिसर मोठा असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागासमोर शहर स्वच्छ ठेवणे मोठे आव्हान होते. त्यामुळे खासगी ठेकेदारामार्फत कंत्राटी कामगारांकडून शहरातील स्वच्छतेची कामे केली जातात. परंतू संबंधित ठेकेदाराने गुरुवारी (ता. १२) रातोरात अचानपणे काम सोडून पळ काढल्याने नागरीकांमधून संताप व्यक्त होत होता.

तसेच विरोधी नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत पालिका प्रशासनाने पाच दिवसात शहर स्वच्छ करावे, अन्यथा पालिकेसमोर कचरा टाकून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. कोरोनाच्या संकटासह दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले होते. संबंधित ठेकेदाराने ठेका अर्धवट सोडून पालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करुन दंडाची वसुली करण्याची भूमिका नगराध्यक्षा अनुराधा अदिक यांनी घेतली होती. तसेच तातडीने विशेष सभेचे आयोजन करुन शहर स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिल्याने आता पालिकेची सभा लक्षवेधी ठरणार आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Municipal Corporation: दोन देशमुखांमध्ये देवेंद्र कोठेंची एन्ट्री; महापालिकेत भाजपच्या साथीने शिवसेना- राष्ट्रवादीची पहिली लढाई

Latest Marathi News Updates : मिलिंद नार्वेकर वर्षा बंगल्यावर गेलेच नाहीत, राजकीय चर्चा खोट्या

Mumbai Vada Pav: मुंबईचा 'वडापाव' खिशाला परवणारा नाही राहिला, इतका महाग झाला; पण, का अन् कसा?

IPL Auction: श्रेयस अय्यरला तर सोडलं, पण आता KKR चा कर्णधार कोण? रहाणे-डी कॉकचा पर्याय पण...

Vaibhav Suryavanshi : राजस्थानने 1.10cr मोजले, पण १३ वर्षीय खेळाडूला IPL 2025 खेळता येणार नाही? नियम काय सांगतो वाचा

SCROLL FOR NEXT