sterilization surgery dogs 950 rupees per dog 10 thousand free dogs in ahmednagar esakal
अहिल्यानगर

Ahmednagr News : अहमदनगर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; शहरात मोकाट १० हजार कुत्री

निर्बीजीकरणासाठी मिळेना ठेकेदार

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : शहरात मोकाट दहा हजारांपेक्षा अधिक कुत्री असल्याचा महापालिकेचा अंदाज आहे. या कुत्र्यांनी शहरात दहशत निर्माण केली आहे. त्यात ही कुत्री पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी महापालिकेला ठेकेदार संस्था मिळेना. परिणामी, या मोकाट कुत्र्यांच्या भीतीने नगरकरांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

शहरातील मोकाट कुत्र्यांनी आतापर्यंत अनेकांना चावे घेतले आहेत. त्यात काही बालकांचा बळीदेखील गेला आहे. मुकुंदनगर, केडगाव, झेंडी गेट, बोल्हेगाव, तसेच सावेडी उपनगरात मोकाट कुत्र्यांची संख्या अधिक आहे.

ही कुत्री घोळक्याने येऊन नागरिकांवर हल्ला करत आहेत. विद्यार्थी, महिला, वृद्ध त्यांच्या हल्ल्यात जखमी होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिकेला अद्याप यश आलेले नाही.

शहरातील ही मोकाट कुत्री पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी पिंपळगाव माळवी येथे श्वान निर्बीजीकरण केंद्र उभारण्यात आले. सुरवातीला ‘पीपल फॉर ॲनिमल’ या संस्थेला निर्बीजीकरणाचे काम देण्यात आले.

शहरातील सुमारे साडेपाच हजार कुत्री पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याचा दावा या संस्थेने केला. असे असले, तरी शहरातील कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढलेली आहे. आज रोजी शहरात मोकाट दहा हजारांपेक्षा अधिक कुत्री असून, त्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

करारनामा संपल्यानंतर ‘पीपल फॉर ॲनिमल’ या संस्थेने पुढे काम करण्यास नकार दिला. त्यामुळे महापालिकेने या कामासाठी नव्याने निविदा मागवली. मात्र, एकही ठेकेदार संस्था कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यास पुढे आलेली नाही.

मनपाकडे नाही यंत्रणा

मोकाट कुत्री पकडण्यासाठी महापालिका ठेकेदार संस्थांवर अवलंबून आहे. मात्र, ठेकेदार संस्था हे काम करण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत महापालिकेने स्वतःची यंत्रणा उभी करून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी महापालिकेकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा उच्छाद सुरूच आहे.

अपघात वाढले

कुत्री मागे लागल्याने, अथवा अचानक आडवी आल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांना अपघाताला तोंड द्यावे लागले आहे. त्यात काहींना अपंगत्वदेखील आलेले आहे. कुत्र्यांमुळे होणाऱ्या या लहान-मोठ्या अपघातांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. टोळी करून मोकाट फिरणारी ही कुत्री शाळकरी मुलांवर हल्ले करत आहेत.

दृष्टिक्षेपात..

  • शहरातील मोकाट कुत्री- १००००

  • निर्बीजीकरण झालेली कुत्री- ५५००

  • एका निर्बीजीकरणाचा खर्च- ९५०

मोकाट कुत्री पकडण्यासाठी सध्या आमच्याकडे कोणतीही यंत्रणा नाही. या कामासाठी निविदा मागविण्यात आली होती, परंतु ठेकेदार संस्थांनी निविदेला प्रतिसाद दिलेला नाही. आता दुसऱ्यांदा निविदा मागविण्यात येणार आहे.

- परीक्षित बिडकर, प्रमुख, कोंडवाडा विभाग, मनपा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT