MP Sujay Vikhe Convoy: शेवगाव तालुक्यातील सुकळी, ठाकूर निमगावात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाहनांचा ताफा व साखरेचे ट्रक सकल मराठा समाजाच्या तरुणांनी अडवले. तसेच ‘तुम्ही वाहनाच्या खाली उतरू नका आणि आम्हाल तुमची साखर ही नको. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याच नेत्याला गावात प्रवेश मिळणार नाही, असे सांगत ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे खासदार विखे यांना वाहनांच्या ताफ्यासह आल्या पावली परत फिरावे लागले.
खासदार विखे यांनी आज बोधेगाव परिसरातील गावांत साखर वाटप केले. यावेळी सकल मराठा समाजबाधवांनी मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण मिळावे, हा मुद्दा लोकसभेत मांडून आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करणारे निवेदन दिले. त्यावर मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच तोडगा निघणार असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी उपस्थितांना सांगितले.
ते म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वीही पालकमंत्री राधाकृष्ण विखे व मी सकारात्मक भूमिका मांडली आहे. आमचे समर्थन प्रत्येक वेळी सकल मराठा समाजाच्या बाजूने राहिले असून, मराठा बांधवांच्या मागे आम्ही सदैव खंबीरपणे उभे आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच मराठा आरक्षणावर योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असे त्यांनी मत व्यक्त केले.
यावेळी ताराभाऊ लोढे, बापूसाहेब पाटेकर, नितीन काकडे, रजाक शेख, बाबा सावळकर, बाळासाहेब कोळगे, महादेव घोरतळे, मयूर हुंडेकरी, बाळासाहेब कोळगे, संजय खेडकर,भगवान मिसाळ, बाळासाहेब डोंगरे, राम केसभट, अमोल सागडे व ग्रामस्थ उपस्थित होते.(Latest Marathi News)
२२ जानेवारीला दुसरी दिवाळी
२२ जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, याच पार्श्वभूमीवर साखर व चणाडाळ वाटपाचे नियोजन चालू आहे, असे सांगून २२ जानेवारीला आपण दुसरी दिवाळी साजरी करणार आहोत. त्यामुळे सर्व लाभधारकांनी या साखरेतून दोन लाडू बनवून श्रीरामाच्या चरणी नैवेद्य म्हणून ठेवावेत, असे आवाहन खासदार विखे यांनी केले. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.