शिर्डी : नगर लोकसभा मतदारसंघात जनतेने दिलेला कौल आपणास मान्य आहे. मतदान यंत्राबाबतही आपला आक्षेप नाही. मात्र, या निवडणुकीत काही मतदान केंद्रावर आपल्याला अपेक्षेहून कितीतरी कमी मतदान झाले. एवढे कमी मतदान होऊ शकत नाही. अशा तक्रारी कार्यकर्त्यांनी बैठकीत केल्या. त्यामुळे आपण चाळीस मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅटच्या पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती नगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे पराभूत उमेदवार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
चाळीस मतदान यंत्रांसाठी प्रत्येकी ४७ हजार २०० रुपये अशी एकूण १८ लाख ८८ हजारांची रक्कम त्यांनी जिल्हा कोषागार कार्यालयात जमा देखील केली आहे. निवडणूक आयोगाने अशा स्वरूपाची पडताळणी करण्याची सवलत यंदापासून देऊ केली आहे.
पराभव पचवायला शिका खासदार लंके
अहमदनगरचा निकाल ४ जूनला जाहीर झाला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व बाबी वारंवार तपासूनच निकाल जाहीर केला आहे. तुम्हाला मतदारांनी नाकारले आहे. पराभव खुल्या दिलाने पचवायला शिका, असा सल्ला खासदार नीलेश लंके यांनी डॉ. सुजय विखे यांना दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.