Interchange sakal
अहिल्यानगर

Surat-Chennai Highway : नान्नज आणि अरणगावला इंटरचेंज सुरत-चेन्नई महामार्ग; ७० हेक्टर जमिनीची संपादन प्रक्रिया सुरु

सुरत - चेन्नई हरित महामार्गासाठी जामखेड तालुक्यातील नान्नज आणि अरणगाव याठिकाणी इंटरचेंज करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

संतराम सूळ

जामखेड सुरत - चेन्नई हरित महामार्गासाठी जामखेड तालुक्यातील नान्नज आणि अरणगाव याठिकाणी इंटरचेंज करण्यात येणार आहे. त्यामुळे नान्नज आणि अरणगाव परिसरात महामार्गावर चढण्या उतरण्याची सोय होणार आहे.

जामखेड तालुक्यातील नान्नजला एक व अरणगाव आणि गरडाचे पाटोद्याच्यामध्ये एक असे दोन इटरचेंज करण्यासाठी तीन गावात मिळून अंदाजे ७० हेक्टर जमिनीचे अतिरिक्त संपादन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूनीवर सुरत - चेन्नई हरित महामार्गाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त सर्व्हे करून पुढील प्रक्रिया राबवली आहे.

या महामार्गाची जामखेड तालुक्यातील एकुण लांबी २६ किलोमीटर आहे. यासाठी तालुक्यातील १२ गावातील अंदाजे १७८ हेक्टर क्षेत्र संपादन करण्यात येणार आहे. तालुक्यातील एकूण १२ गावांमधून जात असला तरी प्रत्यक्षात या महामार्गावर चढण्या उतरण्यासाठी नान्नज आणि अरणगाव परिसरात जावे लागणार आहे.

सुरत - चेन्नई हरित महामार्ग महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, बीड, धाराशीव व सोलापूर अशा ५ जिल्हयांमधून जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लांबी १४१ किलोमीटर आहे.

सुरत - चेन्नई हरित महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. हा प्रकल्प मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.

- डी. एस. झोडगे, प्रकल्प संचालक, सुरत- चेन्नई हरित महामार्ग

सुरत - चेन्नई हरित महामार्गाला जामखेड तालुक्यात नान्नज आणि अरणगाव परिसरात इंटरचेंज प्रस्तावित आहे. यासाठी सर्व्हे आणि भूसंपादन प्रक्रिया राबवली जात आहे.

- सी. बी. बांगर, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, जामखेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

Mumbai Local News: मुंबईकरांनो लक्ष द्या, आज तीन तासांचा ब्लॉक!

Maharashtra Winter Update: थंडीपासून जरा जपूनच, निच्चांकी तापमान 10 अंशांवर; राज्य गारठलं!

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

SCROLL FOR NEXT