teachers strike for old pension scheme 387 school closed report ahmednagar marathi news esakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : विद्यार्थी हजर, शिक्षकांची दांडी; ३८७ शाळा बंदचा अहवाल पाठवणार

६ हजार ५१६ जण गैरहजर, एकूण ८०९ शाळांपैकी केवळ ५२२ शाळाच सुरू

सकाळ वृत्तसेवा

Ahmednagar News : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काल पुकारलेल्या संपामुळे तब्बल ३८७ शाळा अचानक बंद करण्यात आल्या. त्यामुळे पालकांची चांगलीच धांदल उडाली. एकूण ८०९ शाळांपैकी केवळ ५२२ शाळाच सुरू होत्या. प्राथमिक शिक्षकांनी संपाला बाहेरून पाठिंबा दिल्याने त्या शाळा सुरळीत होत्या.

सहा हजार ५१६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. संप मिटल्याने शुक्रवारी शाळा पूर्ववत सुरू झाल्या; अन्यथा हिच परिस्थिती विद्यार्थी, पालकांनी अनुभवावी लागली असती.

राज्य सरकारने या संपाबाबत शिक्षण विभागाला अहवाल देण्यास सांगितले होते. त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या ८०९ आहे. यात अहमदनगर महापालिकेच्या हद्दीतील शाळांचाही समावेश आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या ११ हजार ३८६ आहे.

त्यातील ५ हजार ७० शिक्षक व कर्मचारीच शाळेत हजर असल्याचे आढळून आले. जिल्ह्यात सर्वाधिक ११२ शाळा संगमनेर तालुक्यात आहेत. तेथे ५७ शाळा बंद राहिल्याचा अहवाल आहे.

जुनी पेन्शन, शाळांचे खासगीकरणासह विविध १७ मागण्यांसाठी माध्यमिक शिक्षकांनी संप पुकारला होता. सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनीही या संपात सहभाग घेतला होता. जे शिक्षक व कर्मचारी गैरहजर राहतील, त्यांचा हजेरीबाबतचा अहवाल पाठविण्याच्या सूचना शिक्षण विभागाला मिळाल्या होत्या.

माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी शहरातील बहुतांशी शाळांना भेटी दिल्या. त्यातील निम्म्या शाळा बंद असल्याचे आढळून आले. काही ठिकाणी शाळा सुरू होत्या. मात्र, तासिका तत्त्वावरचे शिक्षक हजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शिक्षण विभागातील जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनीही पाहणी केली असता निम्म्यावर शिक्षक दांडी यात्रेला गेल्याचे निदर्शनास आले.

संपाचा पालकांना संताप

शिक्षकांचा संप नियोजित होता. परंतु संपाच्या दिवशी शाळा सुरू राहणार की बंद याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांना कोणतीच कल्पना नव्हती. विद्यार्थी शाळेत गेल्यावर त्यांना वर्गाला टाळे असल्याचे दिसले. ज्या विद्यार्थ्यांना पालक शाळेत सोडवायला जात नाहीत. त्यांची सर्वाधिक गैरसोय झाली. काहींना काम सोडून पाल्यांची सोय लावावी लागली.

रजा टाकणार की...

संप रास्त मागण्यांसाठी असला, तरी सामान्य माणसांची, रुग्णांची तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याचे शिक्षक विभागाच्या अहवाल निदर्शनास आले आहेत. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना एक, तर रजा टाकावी लागणार आहे. नाही तर सरकारसोबत संप काळातील हजेरीबाबत भांडावे लागेल.

खासगी शाळा सुरळीत

सरकारी, निमसरकारी शाळांतील शिक्षक संपावर गेल्‍यामुळे त्‍या शाळांमध्ये अध्यापन झाले नाही. मात्र खासगी व्यवस्‍थापनाच्या शाळा सुरू होत्‍या. कोणत्‍याही संपात त्‍यांचे अध्यापन बंद नसते.

कुठे बंद किती, दांडीवर किती

तालुका -बंद शाळा -गैरहजर

अकोले - ० - ९७

संगमनेर - ५७- १०८०

कोपरगाव -१३ -३२०

राहाता - ० -३१९

राहुरी - २२ - ५२३

श्रीरामपूर -३० -४०५

नेवासे - ४४- ४३५

शेवगाव - ३८- ५६७

श्रीगोंदे - ४०- ५९६

पारनेर -३२ -५६०

पाथर्डी - ३८ -६५२

जामखेड - २०- २४०

कर्जत - ३१ -४७९

नगर शहर -२२ -२४३

एकूण बंद -३८७ -६५१६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT