ahmednagar sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : घर कागदावरच; प्रतिसादाअभावी योजनाच उघड्यावर

योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व त्यांना या योजनेची सविस्तर माहिती मिळावी, यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केले होते

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : गरीब व बेघर कुटुंबांना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून घरकुल योजना राबविली जाते. शहरात या योजनेंतर्गत लाभ मिळत असला, तरी त्यामध्ये अनेक अडचणी आहेत. त्या सोडविण्याबाबत आज केंद्राने आयोजित केलेल्या योजनेच्या प्रशिक्षणात महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवकांनी आॅनलाईन प्रशिक्षण घेतले. त्यानुसार येत्या १८ तारखेला याबाबत पदाधिकारी, अधिकारी व ठेकेदारांची बैठक होणार आहे. प्रलंबित प्रकरणांबाबत या बैठकित चर्चा होणार आहे.

शहरी गृहनिर्माण व व्यवहार मंत्रालय (मुंबई) यांच्या आदेशान्वये आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (मुंबई) यांच्या मार्फत प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी हे प्रशिक्षण झाले. यामध्ये महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, उपायुक्त श्रीनिवास कुऱ्हे, आस्थापना विभाग प्रमुख अशोक साबळे, प्रकल्प विभाग प्रमुख गणेश गाडळकर आदी उपस्थित होते.पंतप्रधान आवास योजना सन २०१५ मध्ये सुरू झाली. अहमदनगर महानगरपालिकेमार्फत केडगाव व नालेगाव येथे योजना राबविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत चार घटक आहेत. शहरात विविध योजनांबरोबरच रमाई योजनेचे काम महानगरपालिकेमार्फत सुरू आहे. या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व त्यांना या योजनेची सविस्तर माहिती मिळावी, यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत होणारी कामे व त्याचा फायदा व मिळणारी सवलती, याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली.

केंद्र सरकारच्यावतीने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत देशभर नागरिकांचे स्वतःच्या हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी विविध योजना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविली जात आहे; परंतु स्थानिक पातळीवर अहमदनगर महानगरपालिकेमार्फत सुरू असलेल्या घरकुल योजनेच्या कामात विविध अडचणी निर्माण होत आहेत. त्या सोडविण्यासाठी लवकरच बैठक होईल.

- रोहिणी शेंडगे, महापौर

नोंदणीला अल्प प्रतिसाद

घरकुल योजनेंतर्गत घरकुले नोंदणीसाठी अल्प प्रतिसाद आहे. त्यामुळे महापालिकेकडून इतर एजन्सी नेमून नोंदणी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र नोंदणीअभावी या घरकुलांचे काम अर्धवट आहे. नालेगावजवळ असलेले घरकूल प्रकल्प अर्धवट राहिला आहे. शासनाचे अनुदान असूनही या योजनेला जनजागृतीअभावी व गरजुंना आवश्यक ते कागदपत्रांची पूर्तता करण्यात अडचणी असल्याने या योजनेला हवा तसा प्रतिसाद नाही. याबाबत बैठकित निर्णय होणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT