जिल्ह्यातील बाधितांची संख्या दोन लाख ७५ हजार ४८८ झाली आहे. आतापर्यंत पाच हजार ५८० जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ५७८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
अहमदनगर : कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. दिवसभरात ३०९ रुग्ण आढळून आले. शेवगाव तालुक्यात सर्वाधिक ३८, तर नगर शहरात अवघे पाच रुग्ण आढळून आले. कोरोनावर (Corona) उपचार सुरू असलेल्यांची संख्या आता तीन हजार ४६ झाली आहे. (the number of corona is declining in ahmednagar)
जिल्ह्यातील सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण शेवगाव, पारनेर, जामखेड, पाथर्डी आणि श्रीरामपूर या पाच तालुक्यांत आहेत. भिंगार, नगर शहर व नगर तालुक्यातील नवीन रुग्णांची संख्या घटली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेत १४, खासगी प्रयोगशाळेत १८० व रॅपिड अँटिजेन चाचणीत ११५ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील बाधितांची संख्या दोन लाख ७५ हजार ४८८ झाली आहे. आतापर्यंत पाच हजार ५८० जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ५७८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आजअखेरपर्यंत दोन लाख ६६ हजार ८६२ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८७ टक्के झाले आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
शेवगाव ३८, पारनेर ३७, जामखेड ३०, पाथर्डी २९, श्रीरामपूर २७, राहुरी २१, श्रीगोंदे २०, नेवासे १८, संगमनेर १८, राहाता १४, कोपरगाव १३, अकोले व कर्जत प्रत्येकी १२, नगर तालुका आठ, नगर शहर पाच, भिंगार छावणी परिषद एक व परजिल्ह्यातील सहा. (the number of corona is declining in ahmednagar)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.