Kukdi Project esakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : कुकडीचा कधी बसणार मेळ शेतकऱ्यांचा होतोय अवमेळ; कागदावरचे सिंचन नावाला

Shrigonda News : तीन जिल्हे व सात तालुक्यांतील राजकारण ज्या कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर खेळवले जाते, त्या प्रकल्पातील पाण्याची वास्तवता कुणीच लक्षात घेतलेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : तीन जिल्हे व सात तालुक्यांतील राजकारण ज्या कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर खेळवले जाते, त्या प्रकल्पातील पाण्याची वास्तवता कुणीच लक्षात घेतलेली नाही. पाणी मिळत नाही, अन्याय होतो ही बाब जरी खरी असली, तरी त्यामागील नेमके गमक कुणीच शोधत नाही. आवर्तनात पाणी क्षेत्रावर दिले जात नाही, तर दिवसांवर दिले जात असल्याने विसंगती आहे.

राज्यात सिंचनाच्या बाबतीत पहिल्या पाच तालुक्यांत श्रीगोंदे तालुका आहे, अशी शेखी कायमच मिरवली जाते. पण, ते वास्तव आहे का याची तपासणी होत नाही. कुकडी, विसापूर, घोड ही धरणे व भीमा, घोड, सरस्वती, हंगा आदी नद्यांचे पाणी यामुळे श्रीगोंद्यात बागायती शेती वाढली हे खरे असले, तरी त्यातून नेमका किती क्षेत्राला खरा फायदा होतो याचाही अभ्यास व्हावा.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कुकडीच्या पाण्याचा मुद्दा चर्चेचा मुद्दा होता. आता यापेक्षा विधानसभेला तो जास्त प्रकर्षाने पुढे आणला जाईल. कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरील पाण्याचे राजकारण करणाऱ्या नेत्यांनी प्रकल्पाचा अभ्यास केला पाहिजे व त्यातून शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा आहे.

श्रीगोंद्यासह ज्या तालुक्यातील कुकडीच्या डाव्या कालव्यावर लाभक्षेत्र आहे, त्या प्रत्येक तालुक्यात निर्मित लाभक्षेत्र वेगळे व सिंचन क्षेत्र वेगळे आहे. या सात तालुक्यापैकी सर्वाधिक लाभक्षेत्र श्रीगोंद्याचे असून, पाण्याचे राजकारणही याच तालुक्यात जास्त होते. कुकडीच्या पाण्याचे नेमके नियोजन करण्यासाठी अभ्यासू व्यक्तींनी पुढे येणे गरजेचे आहे. काही लोक याबाबत जागृती करतात. पण त्यातही श्रेयवादाचा भाग आला की अडचणी होतात हा इतिहास आहे.

श्रीगोंद्यातून जाणाऱ्या डाव्या कालव्यातील ९० ते १६५ किलोमीटर अंतरामधील भाग श्रीगोंदे तालुक्यात येतो. त्यातही ९० ते ११० हे पहिले वीस किलोमीटरवरील गावांचे सिंचन नारायणगाव (पुणे) विभागाच्या अखत्यारीत येतो. त्यात जवळपास ९ हजार हेक्टर क्षेत्र आहे. उर्वरित २१ हजार हेक्टर तो भाग श्रीगोंदे जलसंपदा विभागाकडे आहे.

खरीप व रब्बी हंगामात तालुक्यातील या भागाला अकरा ते बारा दिवस पाणी राहते. पूर्वी एकरी पध्दतीत सिंचन होते. आता मात्र हे सिंचन हेक्टरी असून एका हेक्टरला १ क्युसेक पाणी दिले जाते. बारा दिवस पाणी राहिले म्हणजे त्यातून बारा हजार हेक्टर क्षेत्र भिजते.

उन्हाळी हंगामात मात्र साडेसहा ते सात दिवसच पाणी तालुक्याच्या वाट्याला येते व त्यातून साडेपाच ते सहा हजार हेक्टर क्षेत्रच भिजते. हे गणित लक्षात घेता श्रीगोंद्यातील २१ हजार हेक्टरपैकी केवळ अकरा ते बारा हजार हेक्टर क्षेत्रच कुकडीच्या डाव्या कालव्यावर भिजते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मग उर्वरित क्षेत्राचे नेमके काय होते हाही प्रश्नच आहे. (पूर्वार्ध)

कुकडी डावा कालवा तालुकानिहाय

प्रकल्पीय सिंचन क्षेत्र

कंसात निर्मिती सिंचन क्षेत्रातील फरक

  • जुन्नर १६७८ (१६७८)

  • पारनेर ९५५० (९५५०)

  • श्रीगोंदे ३०६१६ (३०२८८)

  • कर्जत २९९९० (२९७६५)

  • करमाळा २४५६२ (१९३१).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT