शेवगाव-पांढरीपूल रस्ता 
अहिल्यानगर

पहिल्याच पावसात शेवगाव-पांढरीपूल रस्त्याची लागली वाट

राजू घुगरे

अमरापूर (शेवगाव) : पहिल्याच पावसाने शेवगाव-पांढरी पूल रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्डे, चिखल आणि त्यात साचलेले पाणी यामुळे वाहन चालक व नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यानंतर बुजवलेले व न बुजवलेले खड्डे पहिल्याच पावसात पाण्याने तुडूंब भरल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामाचे पितळ उघडे पडले आहे.

शेवगाव मिरी पांढरीपूल हा रस्ता नगर, राहुरी व शनिशिंगणापूर येथे जाणाऱ्या वाहनांसाठी व नागरिकांसाठी प्रमुख वर्दळीचा रस्ता आहे. गेल्या वर्षी झालेल्या पावसाने तालुका हद्दीतील निंबेनांदूर, माका शिवारापर्यंत तो जागोजागी खचला व फुटला होता. त्यानंतर या रस्त्यावरील खड्डे काही ठिकाणी बुजविण्यात आले. तर माका जवळील खारा ओढा ते निंबेनांदूर विद्यालय या दरम्यान नवीन रस्ता करण्यात आला. मात्र निंबेनांदूर ते ढोरजळगाव, आपेगाव, आखतवाडे, मळेगाव या दरम्यान मात्र गेल्या वर्षाच्या पावसाळ्यात पडलेले खड्डेही अद्याप बुजवलेले नाहीत.(The Shevgaon-Pandharipul road was damaged due to rains)

पावसाळ्यापूर्वीची इतर डागडुजीची कामे या वर्षी करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पहिल्याच पावसाने हा रस्ता जागोजागी चिखलात गेला आहे. रस्त्यात जागोजागी पडलेल्या खड्ड्यात पाणी साचले आहे. पाणी साचल्याने खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने पावसाळा सुरु होताच वाहन चालकांची व नागरिकांची तारेवरची कसरत सुरु झाली आहे. रस्त्यावरील पाणी चर खोदून बाजूला न काढल्याने व दुतर्फा वाढलेली झुडपे न काढल्याने रस्त्याच्या दुरवस्थेत आणखी भर पडली आहे.

ढोरजळगाव येथील नाकाडे वस्ती व बसस्थानक परिसर, मळेगाव वस्ती येथील फरशी पूल व निकम वस्ती, वडुले बुद्रुक बसस्थानक परिसर आपेगाव येथील पेट्रोल पंप या परिसरातील रस्ता पूर्णपणे खचला आहे. त्यात पहिल्याच पावसाचे पाणी साचल्याने दुरवस्थेत भर पडली आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मागील वर्षी खड्डे बुजवताना मंजुरीसाठी पाठवलेल्या भागाच्या पॅचिंगचे काम मागे ठेवले होते. मात्र, कोविड संसर्गामुळे गेल्या वर्षीपासून मंजूर झालेल्या या कामासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही. आता या कामाची निविदा प्रक्रीया पूर्ण झाली असून लवकरच या कामास सुरवात करण्यात येईल.

- अंकुश पालवे, सहायक अभियंता बांधकाम विभाग (The Shevgaon-Pandharipul road was damaged due to rains)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT