जिल्ह्यात नवे २३५ रुग्ण बाधित आढळून आले.
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत अल्पशी घट झाली. नगर शहरात सोमवारी (ता. २८) अवघे तीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात नवे २३५ रुग्ण बाधित आढळून आले. जिल्ह्यातील बाधितांची संख्या यामुळे दोन लाख ७९ हजार ८९ झाली आहे. सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या पाच हजार ८७२ झाली आहे. (three corona patients were found in ahmednagar on monday)
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ५, खासगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ७०, तर अँटिजेन चाचणीत नवे १६० रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या रुग्णसंख्येत पारनेर तालुक्याने आघाडी घेतली आहे. पारनेरमध्ये सर्वाधिक ३५ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात सर्वांत कमी रुग्ण नगर शहरात अवघे तीन आढळले आहेत. सध्या दोन हजार २३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनातून बरे झालेल्या २७८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत दोन लाख ७० हजार ९८२ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के झाले आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
पाथर्डी १४, पारनेर ३५, राहुरी १७, श्रीगोंदे ३०, अकोले २४, जामखेड १९, संगमनेर २३, शेवगाव ११, कोपरगाव आठ, नगर तालुका सात, श्रीरामपूर १७, राहाता १०, नेवासे ११.
(three corona patients were found in ahmednagar on monday)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.