कोपरगाव : संचारबंदीचा आदेश डावलून डुकरांची वाहतूक करताना पोलिसांनी दोघांना पकडले. 20 हजार रुपये किमतीची 25 डुकरे ताब्यात घेतली. करण अंगमुक्त देवेंद्र (रा. सायन, मुंबई) व विकी राजेश लोट (रा. द्वारका, नाशिक), अशी आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा - कोरोना हटत नाही तोच जगापुढं नवं टेन्शन
शहरातील टाकळी नाका परिसरात वरील आरोपी टेम्पोतून (एमएच 1, सीव्ही 5313) डुकरे नेताना आढळून आले. आरोपींच्या चेहऱ्याला मास्क नसणे, संचारबंदी आदेशाचे उल्लंघन, विनापरवाना वाहतूक आदी कलमांन्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जमावबंदीचे उल्लंघन
शहरातील साई सिटी भागात बेकरीसमोर गर्दी असल्याने बेकरीचालक प्रसाद किशोर रासकर (रा. वेळापूर), देविदास आबा साळवे (रा. चांभारचाळ, कोपरगाव) व मोहनदास गणेशदास डागा (रा. साई सिटी) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
निवारा टाकळी रस्ता भागात जनरल स्टोअर्स व चहाचे दुकान विनापरवाना सुरू ठेवल्याबद्दल सुरेश लक्ष्मण वाणी यांच्याविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.