Tribal People sakal
अहिल्यानगर

Akole News : आदिवासींसह पर्यटकांनी मुखवटे धारण करीत नाचवले नवसाचे बोहडे

वेगवेगळे मुखवटे धारण करीत व पारंपरिक वाद्य वाजवत आदिवासी पुरुष, महिला, तरुण, तरुणींनी निसर्गाच्या सान्निध्यात आपला आविष्कार दाखवत सोमवारची रात्र जागवत नवसाचे बोहडे नाचविले.

सकाळ वृत्तसेवा

अकोले - वेगवेगळे मुखवटे धारण करीत व पारंपरिक वाद्य वाजवत तालुक्यातील आदिवासी पुरुष, महिला, तरुण, तरुणींनी निसर्गाच्या सान्निध्यात आपला आविष्कार दाखवत सोमवारची रात्र जागवत नवसाचे बोहडे नाचविले. या उत्सवासाठी राज्यभरातील पर्यटकांनी हजेरी लावली.

सोमवारी रात्री ९ वाजता सुरू झालेल्या बोहडा कार्यक्रमाची रात्र जागवत मंगळवारी सकाळी कळसूबाई देवीचे मुखवटे बैलगाडीतून निघाल्यावर सांगता झाली. या कार्यक्रमास आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप भांगरे, विमा विकास अधिकारी श्रीनिवास वाणी, कर्डिले, सुरेश भालेराव, योगेश वाकचौरे, डॉ. अनंत घाणे, सहायक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे आदी उपस्थित होते.

गावातील वृद्ध मंडळी मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ होण्याअगोदर काही दिवस बोहाड्यात खेळ काम करणाऱ्या नवागत तरुणांची कसून परीक्षा घेतात. महादेवाची भूमिका करणाऱ्या नटाला नंदीसारखे आणि सरस्वतीचे सोंग वठविणाऱ्याला मोरासारखे तासन् तास न दमता, तसेच नाचता येणे आवश्यक असते. इतकेच नव्हे, तर त्या-त्या नटाला, त्या-त्या प्राण्यांचे ओरडणेही साधावे लागते.

पांजरे व घाटघर येथे आदिवासी समाजाच्या वतीने मानाचे व नवसाचे वोहाडे नाचविले जातात. रात्रीच्या वेळी पलिते पेटवून त्यांच्या प्रकाशात बोहाड्याचा खेळ सुरू होतो.

प्रथम सूत्रधार नमन करतो. मग संबळ आणि पिपाण्यांच्या तालावर विदूषक उड्या मारू लागतो. त्यानंतर भालदार-चोपदार गणपतीच्या आगमनाच्या ललकाऱ्या देतात. पाठोपाठ उंदरावर बसलेला गणपती नाचतनाचत पुढे येतो. गणपतीपाठोपाठ सरस्वती येते आणि नाचून व आशीर्वाद देऊन परत जाते. एवढे झाल्यावर बोहाड्याचे मुख्य कथानक सुरू होते. ते ओळीने पाच पाच रात्री चालते.

एका वेळी दोन-दोनशे नट भाग घेतात. बोहाड्याला आदिवासींच्या जीवनात त्याला महत्त्वाचे स्थान आहे. ही त्यांची धार्मिक भावना आहे. म्हणूनच गाव सुरक्षिततेसाठी त्यांनी ''बोहाडा'' हा उत्सव केलाच पाहिजे, अशी त्यांची श्रध्दा आहे.

लहाने व मोठाले बोहाडे.....

एकाच पाड्यावर दोन-दोन बोहाडे होतात. एका बोहाड्यात कमीत कमी पंचवीस ते तीस कलावंत भाग घेतात. बोहाड्यात सुरुवात कथेने होते. थाप म्हणजे हिंगुळात हाता न पाचही बोटे बुडवून पंजासकट त्याचा ठसा देवळाच्या भिंतीवर उमटवला जातो. तीन दिवसांचा लहान बोहडा तर पाच व सात दिवसांचे मोठाले बोहाडे... साजरे करतात.

लहान बोहाड्यात महत्त्वाची म्हसोबा, राक्षस, देवी (जगदंबा) ही सोंगे नाचवत नाहीत. ती सोंगे मोठ्या बोहाड्यात नाचवली जातात. बोहाड्यात देवीचे पूजन मंगळवारी किंवा शुक्रवारी केले जाते. शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी, शुक्रवारी म्हसोबा व देवीचे सोंगे निघतात.

आदिवासी लोकसंस्कृतीचे आगळेवेगळे दर्शन बोहडा कार्यक्रमातून पहायला मिळते. या कार्यक्रमाला सरकारी पाठबळ मिळणे आवश्यक आहे. राज्याचे सांस्कृतिक विभाग व आदिवासी विभागाने ही बोहडा कला संस्कृती जपण्यासाठी आर्थिक निधी, तसेच उत्कृष्ट बक्षीस योजनांचे नियोजन करणे आवश्यक आहे.

- भास्कर एलमामे, सामाजिक कार्यकर्ते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT