slum collapse by unseasonal rain sakal
अहिल्यानगर

Unseasonal Rain : संसार उभा होण्याअगोदरच मोडला; पावसामुळे उडाल्या पालाच्या झोपड्या

जोरदार वारा व पावसामुळे २० घरकुले पडली, तसेच पालाच्या झोपड्याही उडून गेल्या. त्यामुळे मोठे नुकसान झाले.

सकाळ वृत्तसेवा

खर्डा - जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात सायंकाळी वादळ व जोरदार पावसामुळे खर्डा शहरालगत कानिफनाथ मंदिराच्या पायथ्याशी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीच्या नवीन २० घरकुलांचे काम सुरू होते. काम पत्रा लेवलपर्यंत आले होते. याच परिसरात मदारी बांधव पाल टाकून राहायला आले होते. परंतु संध्याकाळी आलेल्या जोरदार वारा व पावसामुळे ही २० घरकुले पडली, तसेच पालाच्या झोपड्याही उडून गेल्या. त्यामुळे मोठे नुकसान झाले.

लहान मुलांसह वृद्धांचेही मोठे हाल झाले. पालातील भांडे, इतर वस्तूही वाऱ्याने उडून गेल्या. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मदारी समाज निसर्गाच्या संकटामुळे भयभीत झाले असून, घरकुलामध्ये राहण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. गेल्या सात- आठ वर्षांपासून अनेक आंदोलन, संघर्षने मार्गी लागलेला प्रश्‍न निसर्गाने एका क्षणात उद्ध्वस्त केला.

घटनेची माहिती मिळताच ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या कार्यकर्त्यांना घेऊन तत्काळ खर्डा येथील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीची पाहणी केली, तसेच मदारी समाजाला धीर दिला. ते म्हणाले, ५० वर्षांपासून भटक्या समाजातील मदारी समाज खर्डा परिसरात राहतो, गरीब व इमानदार समाज आहे. यांना जमीन, व्यवसाय नाही. कला दाखवून शोभेच्या वस्तू तयार करून भंगार, काच, पत्रा गोळा करून हा समाज उपजीविका भागवतो.

पावसामुळे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या सात वर्षांपासून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीसाठी कार्यकर्त्यांना घेऊन संघर्ष करत आलो आहे. अखेर मदारी समाजाचे स्वप्न होते घरे होतील, घरात जाऊन राहील हे स्वप्न अर्धवट झाले. दानशूर व्यक्ती, कंपन्या, सामाजिक संस्था, तरुण मंडळे, वीट, वाळू, पत्रे, खिडकी, दरवाजे, सिमेंट आदींची मदत करावी. जामखेड तहसीलदार, प्रांत, कलेक्टर, पंचायत समिती, बिडीओ या कामाची नुकसान भरपाई मिळावी, असे ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केले.

यावेळी ग्रामविकास अधिकारी बबनराव बहीर, उपअभियंता सूरज पवार, उमा जाधव ग्रामीण विकास केंद्र सचिव विशाल पवार, आदिवासी नेते संतोष चव्हाण, राजू शिंदे, रजनी बागवान व मदारी समाज उपस्थित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT