Use of drones for field spraying esakal
अहिल्यानगर

ड्रोनची किमया न्यारी पाच मिनिटांत एकरावर फवारणी!

सतीश वैजापूरकर

शिर्डी (जि. अहमदनगर) : अवघ्या पाच मिनिटांत एक एकर क्षेत्रातील पिकावर हवाई औषधफवारणी करण्याची किमया कृषी ड्रोनने साधली. कमीत कमी पाण्याचा वापर केल्याने औषधाच्या खर्चात पन्नास टक्क्यांपर्यंत बचत होते. त्यामुळे अधिक क्षेत्र असलेले शेतकरी कृषी ड्रोनद्वारे हवाई औषधफवारणी करणे पसंत करीत आहेत.

जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग

संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील व राजेंद्र भोसले या युवकांनी त्यासाठी सहा लाख रुपये खर्च करून कृषी ड्रोन खरेदी केले. नगर जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. लोणी येथील बाबासाहेब रामराम आहेर यांच्या सात एकर क्षेत्रातील तुरीच्या पिकावर ड्रोनद्वारे अवघ्या चाळीस मिनिटांत औषधफवारणी करण्यात आली. येथील कृषी सेवा केंद्राचे संचालक रविकिरण राठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रोनद्वारे औषधफवारणी करताना पाण्याचा वापर कमी होतो. पिकांवर तीव्र मात्रेच्या औषधाची फवारणी करणे शक्य होते. कीड व रोगनियंत्रणासाठी हे तीव्र मात्रेचे द्रावण फार प्रभावी ठरते. शिवाय खर्चात पन्नास टक्के बचत होते.

आजवर आठशे एकरांत झालीय फवारणी

ड्रोन मालक सांगतात, आम्ही व्यवसाय करण्यासाठी हे ड्रोन खरेदी केले. त्यास उत्तम प्रतिसाद मिळतो. औषध फवारणीसाठी आम्ही एकरी हजार रुपये आकारतो. द्रावणाचे पंचवीस किलो वजन सोबत घेऊन ड्रोन हवेत उडतो. उंच वाढलेला ऊस व तुरीवर सहजपणे फवारणी करता येते. सर्व पिकांवर आम्ही फवारणी करतो. आजवर आठशे एकरांत आम्ही फवारणी केलीय. शेतकरी समाधानी आहेत. या ड्रोनमध्ये लिथियम बॅटरीचा वापर करण्यात आल्याने वीस मिनिटांत बॅटरी चार्ज होते. दहा ते पंधरा मिनिटांत डिस्चार्ज होण्यापूर्वी तीन एकर क्षेत्रातील फवारणी पूर्ण होते.

''माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमच्या कृषी ड्रोनद्वारे हवाई औषध फवारणीची पाहणी केली. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपयोगी ठरणारे आहे. या ड्रोनची किंमत काही दिवसांनी आणखी कमी होईल. त्यानंतर त्याचा वापर आणखी वाढेल, अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी व्यक्त केली.'' - मधुकर खुळे, कृषी ड्रोन मालक, कोल्हेवाडी, ता. संगमनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT