Vijayadashami Dussehra was celebrated at Nevase  Sakal
अहिल्यानगर

विजयादशमीनिमित्त नेवाशात 'दुर्गा दौड'; नागरिकांकडून कौतुक

सकाळ डिजिटल टीम

नेवासे (जि. अहमदनगर) : विजयादशमीनिमित्त नेवासेत राजे शिवकालीन मर्दानी आखाडा यांच्यातर्फे आयोजित दुर्गा दौडला चांगला प्रतिसाद मिळाला. यात पन्नास मुला-मुलींनी सहभाग घेतला. या वेळी त्यांनी सादर केलेल्या शिवकालीन मर्दानी खेळात थरारक प्रात्यक्षिके झाली.

शिवाजी देशमुख महाराज, विश्वस्त ज्ञानेश्वर शिंदे, नगरसेविका डॉ. निर्मला सांगळे, पोलिस हेड कॉन्स्टेबल तुळशीराम गीते, सुधीर चव्हाण यांच्या उपस्थितीत ध्वज पूजन झाले. भगवा ध्वज फडकावत दुर्गा दौडला प्रारंभ झाला. आयोजक प्रशिक्षक सुरेश लव्हाटे यांनी दुर्गा दौडचे नेतृत्व केले. दुर्गा दौड नेवासे शहराच्या मुख्य मार्गावरून शहरातील दुर्गादेवी मंदिरात आगमन झाल्यावर सर्व बालिकांच्या हस्ते दुर्गामातेची आरती झाली. प्रशिक्षक सुरेश लव्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली युवतींसह बालिकांनी शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके केली.

दुर्गा दौडचे स्वागत

दुर्गा दौडचे शहरात नगराध्यक्ष योगिता पिंपळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, ॲड. काकासाहेब गायके, सुहास पठाडे, बालेंद्र पोतदार, गणेश सोनवणे, अजय पठाडेंसह विविध राजकीय, सामाजिक संघटनांनी स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : प्रकाश आंबेडकर, AIMIM अन् अपक्ष, महाराष्ट्रात कोणाचा खेळ बिघडणार? गणित समजून घ्या...

स्टार प्रवाहच्या नायिकेची झी मराठीवर एंट्री; 'लक्ष्मी निवास' मालिकेत देणार पाठक बाईंना टक्कर; पाहा नवा प्रोमो

Mumbai Vidhansabha Result: दक्षिण मुंबईतील कौल नक्की कोणाला? मनसेमुळे लढतीत रंगत!

Jaggery Poha Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा गोड गुळाचे पोहे, लगेच लिहा रेसिपी

AUS vs IND 1st Test: बुमराहने टॉस जिंकल्याने टीम इंडियाचा पर्थ कसोटीत विजयही पक्का? वाचा काय सांगतायेत रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT