The water of Pimpalgaon Joga dam has not reached Nagar district 
अहिल्यानगर

पुणेकरांनी अडवले नगरकरांचे पाणी, आवर्तनाचा ठिपूसही नाही

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर : गेल्या महिनाभरापासून पिंपळगाव जोगा धरणाच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. पारनेर तालुक्यातील अळकुटीसह १२ ते १३ गावांना एक थेंबही मिळाला नाही. पुणेकरांनी नगरचे पाणी अडवले आहे, असे रांधे‌ गावचे उपसरपंच संतोष काटे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

पाणीच न आल्याने शेतीसह पिण्यासाठी पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. काटे म्हणाले,या आर्वतनातुन पाणी मिळाले नसल्याने या १२ ते १३ गावांतील फळबागा जगविण्यासाठी तरी हे‌ आवर्तन गरजेचे आहे. पिंपळगाव जोगा धरणातून पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील हद्दीवर असणा-या गावांनी परस्पर पाणी वळवून घेतल्याने पारनेर तालुक्यातील गावांना या आर्वतनातून १२ गावांना  पाणी  मिळाले. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. या धरणातून आवर्तनास महिना होवूनही पाणी मिळत नसल्याने तालुक्यातील गावांवर अन्याय होत आहे.

पिंपळगाव जोगा धरणातून कळस, पाडळी आळे ,अळकुटी ,शेरी कासारी ,रांधा, पाबळ ,लोणी मावळा, देवीभोयरे, वडझिरे टेल पर्यंत पिंपळगाव जोगा धरणातून पाणी सोडण्यात येत असते.फेब्रुवारी महिन्यात पाण्याचे रोटेशन चालू झाले आहे मात्र अजूनही लोणी मावळा पाबळ गावांना अतिशय कमी प्रमाणात पाणी मिळाले आहे.

अळकुटी, शेरी कासारी, पाडळी आळे, कळस गावांना चालू करण्याअगोदरच बेल्हा गावात पाणी वळून घेतले आहे. फळ बाग असणाऱ्या शेतकऱ्यांना शेत तळी भरण्यासाठी पाणी उचलण्याची गरज असताना उचलून दिले नाही. वीज आणि पाणी मिळेल नाही, तर फळ बागा आणि शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश गंभीर होईल याबाबत याबाबत आमदार लंके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याचे काटे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT