Bhandardara Dam esakal
अहिल्यानगर

भंडारदऱ्याच्या सुरक्षेत त्रुटी; जलसंपदा विभागाचा मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम


अकोले (जि. अहमदनगर) : भंडारदरा जलाशय केवळ दोन पोलिसांच्या भरवशावर असल्याचे वृत्त दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल पोलिस व गुप्तचर विभागाने तातडीने पावले उचलली असून, यापुढे भंडारदरा जलाशयाच्या भिंतीवर प्रवेश बंद करण्याचा, तसेच बंद पडलेले सीसीटीव्ही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे जलाशयावर जाण्यासाठी पोलिस व जलसंपदा कर्मचारी यांच्यावर दडपण आणून दादागिरी केल्यास, सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हादेखील दाखल होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.

पर्यटकांचा राबता असलेल्या व नगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या भंडारदरा धरणाच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचं आढळून आल्यानंतर राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या भिंतीवर नागरिकांचा आणि वाहनांचा वावर, धरणाच्या सुरक्षेत असलेले अपुरे पोलिस बळ याबाबत गुप्तचर यंत्रणेने नाराजी व्यक्त केली आहे. या त्रुटी दूर करण्यासह आणखी काही सूचना अधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाला केल्या आहेत. त्यानुसार जलसंपदा विभागाने तातडीने निर्णय घेऊन यापुढे धरणाच्या भिंतीवर कोणालाही न सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT