Work from home to the employees of Ahmednagar Municipal Corporation esakal
अहिल्यानगर

नगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम

कोविड वाढत्या रूग्णांमुळे घेतला निर्णय

अशोक निंबाळकर

नगर : येथील महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी आज (ता. 16) कार्यालयीन परिपत्रक काढून, काही कर्मचाऱ्यांना "वर्क फ्रॉम होम' करण्याबाबत सुचविले.

महापालिका कामगार संघटनेने गेल्या आठवड्यात कामगारांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सरचिटणीस आनंदराव वायकर यांनी कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन महापालिका अधिकाऱ्यांना कामगार सुरक्षिततेची अंमलबजावणी करण्याचे कळविले.

आयुक्त शंकर गोरे यांनी परिपत्रकात म्हटले आहे, की कोरोना प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी संबंधित खातेप्रमुख अथवा शाखाप्रमुखांना सूचित केले आहे. आपापल्या विभागाकडे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी, कार्यालयासाठी अत्यावश्‍यक लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात कामकाज करण्यासाठी उपस्थित ठेवण्यात यावे.

अत्यावश्‍यक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांची गरज भासल्यास "वर्क फ्रॉम होम'द्वारे कामकाज पाहण्यास कळवावे. संबंधित कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी बंद राहणार नाहीत, याबाबत सूचना देण्यात याव्यात. घरी राहून कर्मचाऱ्यांनी कामाव्यतिरिक्त निवासस्थान सोडून बाहेर पडू नये.

याबाबत तक्रारी आल्यास कडक कारवाई करण्यात येईल. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा, मास्कचा, सॅनिटायझरचा व हॅंडग्लोव्ह्‌जचा वापर करण्याबाबत दक्षता घेण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT