Work from home: IT engineers earn millions in agriculture 
अहिल्यानगर

Work from home चा असाही फायदा, लॉकडाउनमध्ये गावाकडे आलेल्या आयटीतील इंजिनिअरने शेतीत कमावले लाखो

राजू घुगरे

अमरापूर : पुण्यातील आयटी हबममधील संगणक अभियंत्याने, कोरोनामुळे गावाकडे परतल्यानंतर पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन पीकपद्धतीतून लाखोंचे उत्पन्न काढले. 

सामनगाव (ता. शेवगाव) येथील अनंत जनार्दन वांढेकर यांनी शाश्वत उत्पन्नाचा हा नवीन संदेश दिला. संगणक अभियंता पदवी घेतल्यानंतर, परिस्थितीचे चटके आणि दुष्काळी शेतीच्या झळा सोसणाऱ्या अनंतने नोकरीसाठी पुण्याकडे धाव घेतली. एका खासगी बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत रात्रंदिवस काम करूनही शहरात राहणे परवडत नव्हते.

अशातच कोरोनाची साथ आल्याने त्याला गावाकडे यावे लागले. पारंपरिक पिकांना फाटा देऊन त्याने पीकपद्धतीचे नियोजन केले. त्यासाठी आधी पुणे, वाशी, औरंगाबाद येथील शेतीमालाच्या बाजारपेठेचा तेथे जाऊन अभ्यास केला.

हंगामानुसार मागणी असलेल्या व कमी कालावधीत येणाऱ्या फळभाज्या आणि फळपिकांची लागवड करण्याचे निश्‍चित केले. तीन महिन्यांपूर्वी टरबुजांच्या 3500 रोपांची अर्ध्या एकरात लागवड केली. पाणी व मजुरांच्या समस्येमुळे मल्चिंग पेपर टाकला. ठिबकचा वापर करून खते व पाण्याचे व्यवस्थापन केले. 35 हजार रुपये खर्च होऊन, हाती 21 टन उत्पादन आले. व्यापाऱ्यांनी जागेवरच सात रुपये किलो भाव देत सर्व माल खरेदी केला.

मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन यांमुळे साधारण टरबुजांपेक्षा 7 ते 10 किलो वजनापर्यंतचे फळ मिळाले. त्यातून दीड लाखाचे उत्पादन निघाले. सर्व खर्च वजा जाता एक लाख वीस हजार रुपयांचा नफा अर्ध्या एकरात निघाल्याने, शेतीत प्रयोग करण्याचा वांढेकर यांचा हुरूप वाढला. आता त्यांनी पारंपरिक पिकांऐवजी कारली, मिरची, गोड मका या पिकांची प्रत्येकी एक एकर क्षेत्रावर लागवड केली. कंपनीने दिलेले वर्क फ्रॉम होम करीत अर्ध्या एकरात टरबुजांचे दीड लाखाचे उत्पादन घेतले.

दुष्काळी भागात पाण्याची, खर्चाची आणि श्रमाची बचत करून, शाश्वत उत्पन्न मिळून शेती फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून शेतीत वेगवेगळे प्रयोग करीत आहोत. भविष्यात परिसरातील तरुण शेतकऱ्यांच्या माध्यमातून ते अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आहे. 
- अनंत वांढेकर, शेतकरी, सामनगाव (ता. शेवगाव) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT