honeytrap esakal
अहिल्यानगर

अकोलेचा तरूण हनीट्रॅपचा बळी; नैराश्यातून आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

अकोले (जि.अहमदनगर) : अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथील सुमित मंगेश शिर्के (वय 24 ) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या (suicide) केल्याची घटना नुकतीच घडली आहे. मात्र ही आत्महत्या हनीट्रॅप (honeytrap) प्रकरणातून झाली असल्याची धक्कादायक बाब आता उघडकीस आली आहे. नेमका प्रकार काय?

तरुणांना भुलवून वाम मार्गाला...काय घडले नेमके?

सुमित शिर्के या तरुणाला संगमनेर येथील घुलेवाडी परिसरातील एका मुलीने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. सहा महिन्यांपूर्वी या दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली. काही दिवसांनी या प्रेमाची चाहूल मुलीच्या आईला लागली. मात्र या मुलीच्या आईने आपल्या मुलीला व सुमित शिर्के यांस समज दिली नाही. उलट आपल्या हाती बकरा लागला आहे असे समजून तिने सुमित शिर्के या तरुणाकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. तू पैसे दिले नाहीतर तुझ्या घरी येऊन राडा करेल अन् तुला कायमचे आत बसवेल,अशी धमकी तिने द्यायला सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या सुमितने आपल्याकडे येतील त्या पद्धतीने मुलीच्या आईस पैसे देण्यास सुरुवात केली. मात्र कोरोना काळात हातची नोकरी गेल्याने सुमितकडे पैसे उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याने आपल्या मोठ्या भावाकडून अन् आईकडून वेगवेगळी कारणे सांगून पैसे घेतले व संबंधित मुलीच्या आईला पोहोच केले. वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीमुळे सुमितचे अन् संबंधित मुलीचे पटत नव्हते. त्यांचे अनेकदा खटके उडायला लागले. मला तुझ्यासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाही, असे सांगून सुमितने तिला व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर ब्लॉक करून टाकले. मात्र ती मुलगी सुमितला सोडण्यास काही तयार नव्हती. ती घरातील इतर सदस्यांच्या मोबाईलवरून कॉल करून त्यास सतत मानसिक त्रास द्यायची. या कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून सुमित हा मोठ्या मानसिक तणावाखाली होता. आपल्याला पूर्णतः या कुटुंबाने जेरीस आणले असल्याचे त्याच्या लक्षात आले होते. त्यातच मुलीच्या आईकडून कायमच होणारी पैशाची मागणी यामुळे सुमित आपल्या जीवाला कंटाळला होता. हजार दोन हजार रुपये ठीक होती, मात्र आता पैसे मागण्याची त्यांची मजल ही खूपच वाढत गेली होती.

50 हजार रुपये आणून दे, नाहीतर...

सोमवार (ता.9) सुमित हा नेहमीप्रमाणे आपल्या घरात बसला असता त्यास मुलीच्या आईचा फोन आला, मला तू दुपारपर्यंत 50 हजार रुपये आणून दे, नाहीतर तुझ्या घरी येऊन मी आज राडाच करते, तसेच तुझ्यावर पोलीस ठाण्यात जाऊन कम्प्लेट करते, अशी धमकी दिली. त्यामुळे सुमित हा त्या दिवशी खूपच नैराश्यात होता. मुलीच्या आईला 50 हजार रुपये देण्याची आपली परिस्थिती नसून दरवेळी भाऊ व आईकडून पैसे कसे मागायचे, असा यक्षप्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभा होता. त्यातच मुलीच्या आईबरोबर मुलीने ही त्यास फोन करून 50 हजार रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली. मला तू जर 50 हजार रुपये पाठवून दिले नाहीतर मी घरा शेजारी असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या करणार आहे,असा इशारा तिने सुमित याला दिला. त्यातच काही वेळातच तिने आपल्या घराशेजारील विहिरीचे फोटो सुमितच्या मोबाईलवर पाठविले. त्यामुळे सुमित याच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. घरात कुणीही नसल्याची संधी साधून त्याने घरातील टीव्हीचा आवाज मोठा केला,व घरातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. यावेळी मयत सुमितच्या मोबाईलची झाडाझडती घेतली असता, संबंधित मुलीच्या आईचे आलेले फोन तसेच त्या मुलीने त्याच्यासोबत व्हाट्सअपवर केलेली चॅटिंग मिळून आली आहे. त्यामुळे मयत सुमित शिर्के याच्या मृत्यूला प्रेमिका व तिची आईच जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे लवकरच या दोघींवर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तरुणांना भुलवून वाम मार्गाला लावणाऱ्या संगमनेर येथील महिलांवर लवकरच अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे.

पत्रकाराची दलाली !

या प्रकरणात आपल्या बहिणीला मदत करण्यासाठी तिचा एक पत्रकार भाऊ मदत आहे.या पत्रकाराच्या नावाखाली बहीण लोकांना ब्लॅकमेल करण्याचे धंदे करीत आहे.तू बकरा शोध आपण त्याला वाटून खाऊ,असा गोरखधंदा या बहीण भावाचा सुरू आहे.महिलांच्या जीवावर लोणी खाणाऱ्या या पत्रकार भावाची देखील पोलिसांनी चौकशी करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT