अहिल्यानगर

श्रीगोंद्यातील तरुणांची तिरुपती बालाजीला सायकलवारी

संजय आ. काटे

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावात या तरुणांचा हा सायकलचा हजार किलोमीटरचा प्रवास कौतुकाचा विषय तर ठरला आहे. या सात दिवसाच्या प्रवासात त्यांना तीन राज्यातील माणुसकीचे झालेले दर्शनही बोलके आहे.

श्रीगोंदे (अहमदनगर) : 'सायकल चालवा आणि इम्युनिटी वाढवा 'हा संदेश देत शहरातील आठ तरुणांनी थेट एक हजार वीस किलोमीटरचा सायकल प्रवास सात दिवसात पार करीत विक्रम केला. कोरोनाचा (Corona) वाढत्या प्रादुर्भावात या तरुणांचा हा सायकलचा (Bicycle)हजार किलोमीटरचा प्रवास कौतुकाचा विषय तर ठरला आहे. या सात दिवसाच्या प्रवासात त्यांना तीन राज्यातील माणुसकीचे झालेले दर्शनही बोलके आहे. (youngsters from shrigonde visited tirupati balaji on a bicycle)

नगर पालिकेचे नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, नवनाथ दरेकर, अॅड. संपत ईधाटे, गणेश श्रीराम, अमोल मखरे, शुभम धर्माधिकारी, शुभम गांजुरे, नितीन ननवरे या तरुणांनी श्रीगोंदे ते तिरुपती बालाजी हे एक हजार वीस किलोमीटरचे अंतर सात दिवसात गाठले. ६ जूनला त्यांनी प्रस्थान केले. १२ जूनला सांयकाळी ते तिरुपतीला पोचले. या प्रवासादरम्यान महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्रप्रदेशातील लोकांनी केलेले त्यांचे स्वागत त्यांच्यासाठी उर्जा देणाऱ्या ठरल्या. अशोक खेंडके यांचे वजन शंभर किलो असून, गणेश श्रीराम यांना झालेल्या अपघातात शरिरावर दहा शस्त्रक्रिया झाल्या असल्याने पायात लोखंडी राॅड आहेत. ते दीड वर्षे एकाच जागेवर पडून होते. दरेकर, मखरे, ईधाटे हे परिसरात रोज सायकलवरुन व्यायाम करतात. त्यांनी इतरांना उर्जा देत बालाजीला जाण्यासाठी मनाची तयारी करुन घेतली. खेंडके, श्रीराम यांनी जिद्दीच्या जोरावर हा प्रवास लिलया पार केला. यातील धर्माधिकारी, गांजुरे, ननवरे यांनी पहिल्यांदाच बालाजी दर्शन घेतले तेही अशा सायकल वारीच्या रुपाने. गांजुरे यांचे सायकल दुकान असल्याने त्यांनी वेळोवेळी आलेल्या अडचणी तत्काळ सोडविल्याने हा प्रवास सुखकर झाल्याचे तरुणांनी सांगितले.

सायकल चालवा आणि इम्युनिटी वाढवा...

खेंडके व दरेकर म्हणाले, हे आव्हान होते मात्र सगळ्यांनीच एकमेकांना आधार, धीर व साथ देत तयारी दाखविली. कोरोनाचे संकट जगावरुन घालवा हे साकडे बालाजीला घालायचे होते. रोज आठ ते नऊ तासांचा प्रवास केला. दिवसात कमीत कमी अंतर १२७ तर जास्त अंतर १५६ किलोमीटर पार केले. रस्त्यातील येणारा प्रत्येक चढ हा नंतर उतार दाखविणारा आहे हे मनाला पटवून देत होतो. शरीर थकले होते मात्र मन प्रसन्न राहिले. यादरम्यान गावांतील लोकांनी जागोजागी सत्कार केलेच मात्र श्रीगोंद्यात झाडे विक्री करणाऱ्या 'अण्णा' नावाच्या सामान्य व्यक्तीच्या कुटूंबाने आमच्यापाठीमागे रिक्षाने प्रवास करीत एका ठिकाणी डबे पोच करीत आमचे औंक्षण करुन सत्कार केला. या बाबी मनाला स्पर्शून गेल्या.

पोलिसाच्या रुपात बालाजी भेटले...

हे सगळे सायकलवरुन तिरुपतीला गेले मात्र तेथे त्यांचे दर्शन होत नव्हते. त्यांच्याकडे शिर्डी संस्थानचे पत्र होते मात्र बालाजी देवस्थान त्यांना मूळ प्रत मागत होते. बालाजीचे दर्शन होणार नाही या विवंचनेने सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू सुरु झाले. त्याचवेळी तेथे आलेल्या एका पोलिसदादा त्यांना बालाजी ट्रस्टच्या अध्यक्षांकडे जा, असा सल्ला देवून निघून गेले. हे सगळे अध्यक्षांच्या कार्यालयात गेले. तेथील मुख्याधिकाऱ्यांनी बाहेर येत, ही सायकल वारी पाहून कौतुकाची थाप तरुणांच्या पाठीवर मारली आणि दर्शनासाठी थेट तेच बालाजी मंदीरात घेवून गेले. या अदभुत प्रसंगाने श्रीगोंद्यातील तरुणांच्या डोळ्यातील धारा थांबत नव्हत्या. (youngsters from shrigonde visited tirupati balaji on a bicycle)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kashinath Date: पारनेरमध्ये लंकेंच्या गडाला सुरुंग लावणारे काशिनाथ दाते कोण? काय होती रणनीती?

Latest Marathi News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल

Weight Gain Problem : मुलांपासून प्रौढांमध्ये लठ्ठपणामुळे वाढती समस्या, आरोग्यावरील गंभीर परिणाम आणि उपाय...जाणून घ्या

Ahilyanagar Crime : पाळीव 'पोपट' मारला; तिघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, तीन महिन्याच्या शिक्षेसह 500 रूपये दंड

Maharashtra CM : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? ही आहेत ५ मोठी कारणे

SCROLL FOR NEXT