Ahmednagar crime  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar crime : मुलींना फसविणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल,सोशल मीडियावर धर्मवीर प्रॉडक्शनचे पेज

Ahmednagar crime : सोशल मीडियावर नोकरीचे आमिष दाखवून मुलींना फसविणाऱ्या तरुणावर अहमदनगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने मुलींना फसवून गैरवर्तन केल्याचे उघडकीस आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : सोशल मीडियावर धर्मवीर प्रॉडक्शन नावाने पेज तयार करून त्यावरून मुलींना नोकरी देण्याचे आमिष दाखविणाऱ्या तरुणावर तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. योगेश लक्ष्मण थोरात (वय २८, रा. अरणगाव, ता. जामखेड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सावेडी उपनगरात राहणाऱ्या एका तरुणीला सोशल मीडियावर धर्मवीर प्रॉडक्शन नावाच्या पेजवर ७० हजार रुपयांची नोकरी अशी जाहिरात दिसली. पेज चालविणाऱ्या आरोपीने तरुणीकडून मोबाईल नंबर घेत तिला नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल आकाश येथे बोलाविले.

तुला प्रायव्हेट डिटेक्टिव्हचे काम देतो, तुला खूप पैसे भेटतील त्यातील केवळ आठ हजार रुपये तू मला दे, अशी गळ आरोपीने संबंधित तरुणीला घातली. तिने काम करण्यास नकार दिला असता, त्याने तिचा बळजबरीने हात पकडून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी तिची सुटका केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, आरोपीने आतापर्यंत अनेक मुलींना फसविलेले आहे. या प्रकरणाची चौकशी केली, तर मोठे रॅकेट समोर येईल. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मनसेचे सुमित वर्मा, अमोल भालसिंग, अनिकेत सियाळ, प्रकाश गायकवाड व अन्य काहींनी आरोपी थोरात याला पकडून मारहाण केली. आरोपीने त्यांच्या विरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT