Yuva Sena city chief Harshvardhan Kotkar and three others arrested in ransom case 
अहिल्यानगर

खंडणीप्रकरणी युवा सेनेचा शहर प्रमुख कोतकरसह तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

नगर तालुका ः नगर तालुका बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केट येथील व्यापाऱ्यास खंडणी मागणाऱ्या तीन जणांना नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. 

या बाबत मिळालेली माहिती अशी की, नेप्ती कांदा मार्केट येथील व्यापारी महेश जवाहरलाल भराडिया (वय 33 रा. वांबोरी ता. राहरी) यांना तिघा जणांनी वारंवार फोन करून तू जमिनीचा व्यवहार मोडला, म्हणून तुला पैसे द्यावे लागतील अशी फोनद्वारे तसेच दुकानात येऊन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने 20 हजार रुपयांची खंडणी मागितली. 

या बाबत व्यापारी भराडीया यांनी नगर तालुका पोलिसांशी संपर्क साधून होत असलेल्या त्रासाबाबत माहिती दिली. या माहितीवरुन पोलिसांनी भराडीया यांच्या गाळ्यासमोर साध्या वेशात पोलिस तैनात केले. त्यानंतर गुरुवारी (ता.4) दुपारी अक्षय दिलीप कोके व त्याचेबरोबर एक अनोळखी इसम यांनी भराडिया यांच्या गाळ्यात येऊन हर्षवर्धन कोतकर यास फोन लावून देऊन 20 हजार रुपये देण्यास सांगितल्याप्रमाणे भराडिया यांनी अक्षय दिलीप कोके यांचेकडे पैसे दिले.

या नंतर कोके याने हर्षवर्धन कोतकर याला फोन करून सांगितले की, पैसे मिळाले, त्याचवेळी साध्या गणवेशात बसलेल्या पोलिसांनी आरोपी कोके व त्यासोबत असलेल्या अनोळखी इसम याला पकडून ताब्यात घेतले. 

यानंतर व्यापारी महेश जवाहरलाल भराडिया (वय 33 रा. वांबोरी ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पकडण्यात आलेल्या आरोपीविरुध्द नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

युवसेनेचा शहर प्रमुख हर्षवर्धन महादेव कोतकर, अक्षय दिलीप कोके, राजेंद्र गोरख रासकर असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

गुन्हा दाखल झालेला हर्षवर्धन कोतकर यास गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी केडगावमधून अटक केली. या तिघांना शुक्रवारी (दि.5) दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा पुढचा तपास नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप हे करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT