Akola Water Supply sakal
अकोला

Akola Water Supply : अकोल्यातील १३ गावे दूषित पाणी पुरवठ्याच्या विळख्यात

ग्रामपंचायतींकडे ब्लिचींग पावडर उपलब्ध नसणे व इतर कारणांमुळे जिल्ह्यातील १३ गावे दूषित पाण्याच्या विळख्यात सापडली आहेत. जिल्ह्यातील पाण्याच्या १ हजार ७१९ पैकी ५३ नमुने दूषित आढळून आले आहेत. हे नमुने १३ गावांमधील आहेत.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : ग्रामपंचायतींकडे ब्लिचींग पावडर उपलब्ध नसणे व इतर कारणांमुळे जिल्ह्यातील १३ गावे दूषित पाण्याच्या विळख्यात सापडली आहेत. जिल्ह्यातील पाण्याच्या १ हजार ७१९ पैकी ५३ नमुने दूषित आढळून आले आहेत. हे नमुने १३ गावांमधील आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करता यावा, यासाठी ब्लिचींग पावडरची खरेदी ग्रामपंचायत स्तरावर होणे अपेक्षित आहे. परंतु जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती ब्लिचींग पावडर खरेदीत टाळाटाळ करता. त्यामुळे नागरिकांना करण्यात येणारा पाणीपुरवठा ब्लिचिंग पावडर विनाच करण्यात येताे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना नेहमीच आराेग्याशी संबंधित समस्यांना ताेंड द्यावे लागते.

दरम्यान गत महिन्यात जिल्ह्यातील १३ गावांमध्ये ब्लिचींग पावडर नसल्याने व इतर कारणांमुळे अशुद्ध पाणी पुरवठा करण्यात येत आल्याची बाब जिल्हा परिषदेच्या आराेग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाणी नमूने तपासणी अहवालातून समाेर आली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

साथरोगाचा धाेका

दूषित पाणी पिल्यामुळे कॉलरासह इतर साथराेग हाेण्याची शक्यता असते. ग्रामीण भागात शुद्ध पाण्याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे ते स्वच्छ दिसणारे पाणी सुद्धा शुद्ध पाणी समजून पितात, परंतु ते आराेग्यास अपायकारक असते. दरम्यान अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे ग्रामीण भागात साथराेगाची भीती वाढली आहे.

पाण्यामुळे यंदा साथरोगाचा उद्रेक

यंदाच्या पावसाळ्यात ग्रामस्थांना दूषित पाणी पुरवठा करण्यात आल्यामुळे साथरोगाचा धोका अधिक वाढल्याचे दिसून आले. तेल्हारा तालुक्यातील ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे संपूर्ण ग्रामस्थांना कॉलराची लागण झाली होती. याव्यतिरिक्त इतर गावात सुद्धा ग्रामस्थांना कॉलगाची लागण झाल्याने आरोग्य विभागाने संबंधित गावात आरोग्य तपासणी केली.

आढळलेले दूषित पाण्याचे नमुने

तालुका -नमुने- दूषित नमुने

  • अकाेला -१४० -१०

  • बार्शीटाकळी -१८०- ०५

  • अकाेट -१९३ -१३

  • तेल्हारा -१३८- ०२

  • बाळापूर- १३० -०१

  • पातूर -१५९ -००

  • मूर्तिजापूर -१३४- ००

  • अन्य ग्रामीण भाग -०४- ०२

  • नागरी भाग -५४१ -२०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लबूशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT