murder esakal
अकोला

Akola Crime : अकोला जिल्ह्यात ११ महिन्यांत ३८ खून; ५६ गुंड तडीपार

अकोला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिगड चालली आहे. गत ११ महिन्यांमध्ये जिल्ह्यात हत्येच्या एकूण ३८ घटना घडल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिगड चालली आहे. गत ११ महिन्यांमध्ये जिल्ह्यात हत्येच्या एकूण ३८ घटना घडल्या आहेत. यातील ३७ घटना उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

रस्त्यावर दुचाकीचा धक्का लागला तरी चाकू, दगडासह देशी कट्टा व फायटर काढल्याच्या घटना वाढत आहेत. एका पाहणीतून रात्रीच्या सुमारास हत्येच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनात गेले काही महिन्यांपासून शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत.

शहरातील गुन्हेगारांचा रेकॉर्ड तपासून एमडीए कायद्यासह तडीपारच्या कारवाईसुद्धा करण्यात येत आहेत. गत काही महिन्यांमध्ये पोलिस अधीक्षकांनी ५६ जणांवर तडीपार व ७ जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. तसेच आणखी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध गुन्हेगारीची माहिती संकलित करण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्यातच दोन हत्येच्या घटना घडल्या आहेत.

खून, हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ

गत सात महिन्यांमध्ये प्राणघातक हल्ल्याच्या घटनाही घडल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ६२ घटना घडल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. हाणामारीचे ५८३ गुन्हे गत ११ महिन्यांमध्ये दाखल झालेत. यातील बहुतांश प्रकरणांमध्ये पोलिसांनी आरोपींना गजाआड केले आहे.

खुनाच्या घटनांमध्ये वाढ

सन २०२२ या वर्षामध्ये शहरात हत्येच्या २२ घटना घडल्या होत्या. यंदा २०२३ मध्ये त्यात वाढ झाली आहे. गत ११ महिन्यांमध्येच एकूण ३८ हत्येच्या घटना घडल्यात.

थरकाप उडविणाऱ्या घटना

वाशीम बायपास चौक परिसरात १८ जून रोजी उशिरा रात्री सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार प्रा. रणजित इंगळे यांची अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे आर्मी मॅन सचिन भाग्यवान चक्रनारायण याने हत्या केली होती. अन्य एका घटनेत पतीसोबतच्या वादातून आपल्या पाच वर्षांच्या निष्पाप मुलीच्या नाकाला कपड्यांचा चिमटा लावून तिची आईनेच हत्या केली. ही घटना २ जून रोजी घडली होती. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून त्याचा खुलासा झाला होता.

गुन्हेगारीला अंकुश लावण्याचा प्रयत्न

गत काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांवर अंकुश लावण्यात पोलिसांना यश आले असून, ११ महिन्यांमध्ये ५६ गुंडांना तडीपार करण्यात आले आहे. याशिवाय सात गुंडांना एमपीडीए अंतर्गत कारागृहात स्थानबद्ध केले आहे. सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करण्याचे काम सुरूच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT