Ladki Bahin Yojana sakal
अकोला

Ladki Bahin Yojana : सिडींगअभावी ४४ हजार बहिणींचे पैसे अडकले बँकेतच, वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने गोंधळ

सकाळ वृत्तसेवा

अकोला : पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोंबर व नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे तीन हजार जमा होत आहेत. आता ही रक्कम ७५०० रुपयांपर्यंत गेली असून अकोला जिल्ह्यातील तब्बल ४४ हजार लाडक्या बहिणींची ही रक्कम त्यांचे आधार सिडींग नसल्याने अद्यापही खात्यातच अडकून पडली आहे. गेल्या महिनाभरापासून बँकांमध्ये महिलांनी केवायसी, आधार सिडींगसाठी अर्ज केले आहेत. मात्र सर्व्हर डाऊनमुळे महिलांची सिडींग होत नसल्याने बँकांमध्ये गोधळ निर्माण होत आहे.

लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे बॅंक खाते सिडींग नसल्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यावर जमा झालेले पैसे काढता येत नाहीत. आधीचे ४५०० व आता जमा झालेल्या ३००० रुपये अशा ७५०० रुपये बँक खात्यात जमा झाल्याचे मेसेजही महिलांना आले आहेत. मात्र ते काढता येत नसल्याने महिला बँकांमध्ये गर्दी करत असून बँकेतच वाद होऊ लागले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत जिल्ह्यात चार लाख ४३ हजार ३८८ महिलांनी अर्ज केले हाते.

त्यापैकी चार लाख ३५ हजार ८५७ महिलांचे अर्ज पात्र ठरविण्यात आले. तर एक हजार ६६९ अर्ज प्रक्रियेतून बाद झाले आहेत. राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. लाडकी बहिण योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळण्यासाठी अनेक निकष कमी करण्यात आले होते. योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे.

बॅंकांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिल्या टप्यात अकोला जिल्ह्यात २ लाख ५७ हजार ५२९ अर्ज अंतिम करण्यात आले होते. त्यानंतर १ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत एकूण १ लाख ६९ हजार ४५३ अर्ज पोर्टलवर प्राप्त झाले होते. आता पात्र लाडक्या बहिणींची संख्या ४ लाख ३५ हजार ८५७ इतकी झाली आहे. दोन महिन्यांचे खात्यात जमा झालेले तीन हजार रुपये काढण्यासाठी महिलांची बॅंकांमध्ये सध्या मोठी गर्दी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray: एकनाथ शिंदेंचा त्याग; अमित ठाकरेंसाठी शिवसेना 'हा' मतदारसंघ सोडणार

Latest Marathi News Live Updates: दामोदर शिंगडांचे पुत्र सचिन शिंगडा करणार मनसेत प्रवेश

Kajol Angry At Paparazi : "चप्पल काढून मंडपात या" ; पापाराझींवर काजोल भडकली, म्हणाली....

Noel Tata Net Worth: रतन टाटांचा मौल्यवान वारसा नोएल टाटांच्या खांद्यावर; किती आहे संपत्ती?

DSP Mohammed Siraj: 'दबंग' मोहम्मद सिराज; पोलीस उपअधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला

SCROLL FOR NEXT