600 home guards in Washim district will get increased allowance  sakal
अकोला

वाशीम जिल्ह्यामधील 600 होमगार्डना मिळणार वाढीव भत्ता; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

महाराष्ट्र होमगार्डच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा वाशीम जिल्ह्यामधील सहाशे होमगार्डला फायदा होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मंगरूळपीर : महाराष्ट्र होमगार्डच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा वाशीम जिल्ह्यामधील सहाशे होमगार्डला फायदा होणार आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे होमगार्ड हे कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळण्याची मोलाची भूमिका बजावतात, सण, उत्सव, मिरवणूक, निवडणूक अशा अन्यवेळी बंदोबस्तासाठी होमगार्डची मदत घेतली जाते. वाशीम जिल्ह्यात होमगार्डच्या एकूण सहाशे जागा मंजूर असून त्यापैकी ५४१ जागा भरलेल्या आहेत.

उर्वरित ५९ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सध्या या होमगार्डला कर्तव्य भत्ता म्हणून दररोज ५७० रुपये मिळतात. आता या भत्त्यात वाढ करण्यात आली असून १०८३ रुपये भत्ता मिळणारा आहे. याशिवाय उपाहार भत्ता दोनशे रुपये, कवायात भत्ता १८० रुपये, खिसा भत्ता शंभर रुपये भोजन भत्ता २५० रुपये अशी जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन

महाराष्ट्र होमगार्डला ३६५ दिवस काम देण्यात यावे, अशी मागणी मंगरूळपीर पथकामधील होमगार्ड फिरोज भुरी वाले, नदीम हिरेवाले, जयपाल इंगळे, राजूभाऊ गजभार ,मोहम्मद तवकीर ,श्याम मिसाळ ,मयूर मनवर ,शितलदास उचित ,तानाजी शिंदे, किशोर भडांगे ,विनोद पारधी, रहीम कालीवाले, रमजान पप्पू वाले, सोनू नातेकर, महबूब शेख, सागर इंगोले, गोपाल कोंगे,उस्मान पटेल यांनी केली आहे.

एक नजर आकडेवारीवर

होमगार्ड एकूण जागा - ६००

असा मिळेल भत्ता

  • कर्तव्य भत्ता - १०८५ रुपये

  • कवायत भत्ता - १८० रुपये

  • भोजन भत्ता - २५० रुपये

  • उपहार भत्ता - २०० रुपये

महाराष्ट्र होमगार्डच्या विविध भत्त्यामध्ये वाढ झाल्याने याचा लाभ महाराष्ट्र होमगार्डला होईल, होमगार्डने कर्तव्य बजावल्यानंतर तातडीने भत्त्याची रक्कम मिळावी, हीच आपेक्षा आहे व महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतला त्याचा जीआर लवकरात लवकर आचारसंहिता लागण्याअगोदर काढावा व महाराष्ट्र होमगार्डला नवीन भत्त्यानुसार वेतन अदा करावे, अशी मागणी मंगरूळपीर येथील कंपनी कमांडर अमोल सुरोशे यांनी केली आहे.

- अमोल सुरोशे, कंपनी कमांडर मंगरूळपीर

यापूर्वी कर्तव्य भत्ता फार कमी होता. आता महाराष्ट्र सरकारने जवळपास ५१५ ची वाढ केली असून १०८३ रुपये भत्ता मिळेल व इतरही भत्यात वाढ केली आहे.

-शेषराव खोडके, प्रभारी समादेशक मंगरूळपीर

होमगार्डच्या विविध प्रकारच्या भत्त्यात वाढ करावी, अशी मागणी होती. अखेर शासनाने भत्त्यात वाढ केली. शासनाचा हा निर्णय अतिशय चांगला आहे. कर्तव्य भत्त्यात जवळपास महाराष्ट्र सरकारने दुपटीने वाढ केली आहे. सरकारचे मनापासून आभार.

- रशीद शेख, होमगार्ड मंगरूळपीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवा इतिहास अन् प्रभावी कामगिरी... शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या RSSला महाराष्ट्र BJPकडून अनोखी गुरूदक्षिणा

IND vs AUS 1st Test : यशस्वी जैस्वालच्या १५० धावा! पर्थवर ऑस्ट्रेलियाला झोडले, धक्के तिथे पाकिस्तानमध्ये बसले; जगात ठरलाय भारी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हातातून महाराष्ट्र गेला, आता मुंबईही जाणार? महापालिका निवडणुकीत महायुतीचा प्रभाव

Maharashtra Assembly Election 2024 Result: धाकधूक... हुरहूर... अन्‌ जल्‍लोष

"आमचा राजा नाही, महाराष्ट्र हरलास तू"; मनसेच्या धक्कादायक पराभवानंतर मराठी अभिनेत्रीने केली कानउघाडणी

SCROLL FOR NEXT