अकोला

अकोला जिल्‍ह्यातील ७७ गावे असुरक्षित; पुराचा धाेका कायम

सकाळ वृत्तसेवा

अकाेला ः उन्हाचे प्रमाण कमी होत वातावरणात झालेल्या बदलामुळे पावसाळ्याची चाहुल लागली आहे. पावसाळ्यात वेळप्रसंगी उद्‍भवणाऱ्या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात संभाव्य पूरबाधित ठिकाणे ७७ असून, संबंधित गावांना पुराच्या तडाख्याची भीती लागून आहे. त्यादृष्टीने पूरनियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे. (77 villages in Akola district insecure; Floods continue)


पावसाळ्यात अती पावसामुळे जिल्ह्यातील उमा, काटेपूर्णा, शहानूर, माेर्णा, मन, निर्गुणा, आस, वान, गांधारी व मस नद्यांना पूर येताे. जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे जीवितहानी, संपत्तीचे नुकसान, गुरे पशुधनहानी, सामाजिक जनजीवन व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. नदीकाठावरील गावांत, वाडी-वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी जाते. तेथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे लागते. पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर बाधीत गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येतो.

त्यावेळी प्रशासन, लोकप्रतिनिधींची धावाधाव होते. पूर ओसरल्यानंतर हा विषय बेदखल केला जातो. वर्षानुवर्षे अशीच स्थिती आहे. त्यानंतर सुद्धा सरकारी पातळीवरून सकारात्मक कार्यवाही करण्यात येत नाही. प्रत्येक वर्षी नदीकाठच्या गावांना पूराच्या गंभीर धोक्यापासून होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण पातळीवर ग्राम आपत्ती निवारण दल स्थापन केले जाते. त्यासाेबतच जिल्हास्तरावर आपत्ती निवारण पथक कार्यान्वित करुन नागरिकांचा बचाव करण्याचे काम केले जाते. दरम्यान यंदाही जिल्ह्यातील ७७ गावांना पूराचा धोका असून, नदीकाठच्या गावांना ब्लू आणि रेडलाइनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यासाेबतच इतर गावांनाही पुराच्या दृष्टिकोनातून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.


पुरामुळे बाधित हाेणारी गावे
तालुका गावे
अकाेला १२
बार्शीटाकळी १२
अकाेट १०
तेल्हारा ११
बाळापूर ०८
पातुर १०
मूर्तिजापूर १४

जिल्ह्यातील पूरप्रवण गावे
० अकाेला - म्हैसाग, एकलारा, कपीलेश्वर, वडद बु., दाेनवाडा, गांधीग्राम, धामना, चांगेफळ, म्हैसपूर, चांदूर, सांगवी बु., कुरणखेड.
० बार्शीटाकळी - चिंचखेड, निंभाेरा, तामशी, खांबाेरा, वरखेड, वाघजळी, दाेनद खु., टाकळी, राजंदा, सिंदखेड, सुकळी.
० अकाेट - केळीवेळी, किनखेड, पळसाेद, पनाेरी, पिलकवाडी, कुटासा, मडगांव, अकाेट, कराेडी, वरुर.
० तेल्हारा - मनात्री बु., डवला, तळेगांव वडनेर, तळेगाव पातुर्डा, नेर, सांगवी, उमरी, पिळवंद, दानापूर, साैंदळा, वारखेड.
० बाळापूर - वाडेगाव, बाभुळखेड, कासारखेड, हाता, अंदुरा, लाेहारा, कवठा, हातरुण.
० पातुर - पास्टुल, भंडारज खु., आगीखेड, काेठारी बु., चाेंढी, विवरा, आलेगाव, वहाळा बु., सस्ती, तुलंगा.
० मूर्तिजापूर - हेंडज, पिंगळा, काेळसरा, भटाेरी, दातवी, सांगवी, दुर्गवाडा, दापूरा, हिवरा काेरडे, लाखपूरी, पाेही, उनखेड, मंडुरा, माना.


स्थलांतरणासाठी जागा निश्चित
जिल्ह्यातील ७७ पूरप्रवण गावांमध्ये तात्पुरते निवारे उपलब्ध होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच अकोला शहरातील ३३ ठिकाणे, अकोट शहरातील १०, बाळापूर शहरातील ५ ठिकाणे पूरबाधित लोकांच्या स्थलांतरणासाठी निश्चित करण्यात आली आहेत.

बचाव कार्यासाठी दोन बोट उपलब्ध
पूरस्थितीत शोध व बचाव कार्यासाठी अकोट व अकोला येथे प्रत्येकी एक या प्रमाणे दोन रबरी बोट उबलब्ध आहेत. याशिवाय लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रोप ४०० मीटर, इमरजन्सी लाईट इत्यादी शोध व बचाव साहित्य उपलब्ध आहे. त्यासोबतच प्रत्येक तालुका स्तरावर महसूल कर्मचारी, होमगार्ड, पोलिस, स्वयंसेवी संस्था यांचे पथक उपलब्ध आहेत. आवश्यकतेनुसार एनडीआरएफ पुणे व एसडीआरएफ नागपूर यांची मदत घेण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

संपादन - विवेक मेतकर

77 villages in Akola district insecure; Floods continue

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT