बाळापूर (जि.अकोला) : साहेब, मला वाचवा... बापाने अल्पवयात लग्न लावून दिले आणि पतीने जबरदस्ती केली. एक अल्पवयीन मुलगी मंगळवारी (ता.१) रात्री बाळापूर पोलिस ठाण्यात (Balapur Police Station) धडकली आणि आपल्यावरील अन्यायाचा पाढा ठाणेदारांसमोर कथन केला. पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणात पतीसह चार आरोपीला अटक करण्यात आली असून, एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. (Abuse of a minor wife in Akola, Child marriage abuse case filed)
भातुकलीचा खेळ खेळण्याच्या वयात संसार कशाला म्हणतात याची पुसटशी कल्पना नसलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे लग्न बापाने लावून दिले. पतीने बळजबरीने संबंध प्रस्तापित केले. ही धक्कादायक घटना बाळापूर शहरात घडली. या प्रकरणी दोन्ही मुलींचे पती व दोन व्याही, विहिन असे एकूण सहा जणांवर बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. बाळापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार मुळचे बाळापूर शहरातील व सध्या कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास असलेल्या एका दाम्पत्याने त्यांच्या दोन्ही मुलींचे लग्न कालेखानीपुरा बाळापूर येथील दोन सख्ख्या भावांशी लावून दिले. एकीचा ता. २१ मे व दुसरीचा विवाह ता. २६ मे रोजी झाला. आई-वडील पुणे येथे निघून गेले. त्यानंतर अत्यंत कमी वय असलेल्या मुलीशी तिच्या पतीने रविवारी, ता. ३० ते ३१ मेच्या रात्री बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्तापित केले.
तिच्या इच्छेविरुद्ध हा प्रकार घडल्याने तिने मंगळवारी बाळापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणात ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांनी दोन्ही पती विरुद्ध बलात्काराचा व सासू, सासरे आणि आई-वडिलांविरुद्ध बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज वासाळे करीत आहेत.
संपादन - विवेक मेतकर
Abuse of a minor wife in Akola, Child marriage abuse case filed
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.