Acquisition of 210 acres land for solar power project agricultural pumps 12 hour electricity per day sakal
अकोला

Akola News : सौर उर्जा प्रकल्पासाठी २१० एकर जमिनीचे अधिग्रहण; कृषी पंपांना दिवसा १२ तास वीज पुरवठा शक्य

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना; २१० एकर जमिनिचे अधिग्रहण

सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्यात ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यात या योजनेंतर्गत सौर उर्जा प्रकल्प उभारणीसाठी २१० एकर जमिनिचे अधिग्रहण करण्यात आले आहे. लवकरच या जमिनीवर सौर प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरूवात होईल.

यापूर्वी जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना एक अंतर्गत बार्शीटाकळी तालुक्यात पिंपळखुटा येथे १.७५ मेगावॅट क्षमतेचा सौरप्रकल्प उभारून कार्यान्वितही करण्यात आला आहे. या अंमलबजावणीमुळे कृषीपंपांना दिवसाचे १२ तास वीज पुरवठा मिळणार असून साहजिकच शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीची तजवीज यातून होणार, हे नक्की.

या योजनेत जास्तीत जास्त फीडर सौर ऊर्जेवर कार्यान्वित करण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने भर हा शेतीसाठी वीज पुरवठ्यावर दिला जात आहे. या योजनेच्या कार्यान्वयनामुळे शेतीला दिवसा १२ तास वीजपुरवठा तर करता येणारच आहे शिवाय उद्योगांसाठी करावयाच्या वीज पुरवठ्यावरील क्रॉस सबसिडीचा भारही कमी होणार आहे.

याच अंतर्गत गावांतील विविध सुविधा, कार्यालये पूर्णपणे सौर ऊर्जेवर आणण्याचा निर्धार आहे. शिवाय ग्रामीण भागामध्ये सौर ऊर्जेच्या संदर्भातली परिसृष्टी साकारण्याचा उद्देश आहे.

४५० गिगाव्हॅट वीज उत्पन्नाचे लक्ष्य

अपारंपरिक ऊर्जावापरासाठी २०३० पर्यंत ४५० गिगाव्हॅट क्षमतेचे उद्दिष्ट ठेवले आहे. विजेच्या मागणीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यातील वीज पंपांची संख्या ४५ लाख आहे. एकूण विजवापरापैकी २२ टक्के वापर हा शेतीसाठी होतो. त्याअनुषंगाने डिसेंबर २०२५ पर्यंत ३० टक्के कृषी वीजपुरवठा सौर ऊर्जेवर आणण्याचा प्रयत्न आहे.

भाडेपट्ट्यावर जमिनी

‘मिशन २०२५’च्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची वेगाने व व्यापक अंमलबजावणी करण्याचे वेगवान प्रयत्न होत आहेत. या प्रकल्पांसाठी जमीन भाडेपट्ट्याने द्यायला तयार असणाऱ्या शेतकऱ्यांना दर हेक्टरी एक लाख २५ हजार रुपये प्रतिवर्ष इतका मोबदला देण्याची तरतूद आहे.

महावितरणच्या सब स्टेशनजवळ उपलब्ध जमिनींमध्ये असे प्रकल्प उभे राहतील. सौर उर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मोठ्या उद्योजकांनीही तयारी दर्शवली आहे. असे प्रकल्प उभे राहिलेल्या ग्रामपंचायतींना देखील पहिली तीन वर्षे पाच लाख रुपये प्रती वर्ष असे अनुदान दिले जाणार आहे.

मागेल त्याला वीज पुरवठा

- पायाभूत सुविधा निर्माण वर्ष २०२२-२३ मध्ये जिल्ह्यात ३९९ नवीन रोहित्रे कार्यान्वित.

- जिल्ह्यात ४५ कोटी रूपये खर्च करून दोन हजार ५४७ कृषीपंपाना नवीन वीज जोडणी.

- ‘मागेल त्याला वीज पुरवठा’ करण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न.

आकडे बोलतात (सन २०२२-२३)

- १० हजार ७३७ ःघरगुती वर्गवारीतील ग्राहकांना वीज पुरवठा

- २ हजार ३४५ ः वाणिज्यिक वर्गवारीतील ग्राहकांना वीज पुरवठा

- २८० ः औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांना वीज पुरवठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bala Nandgaonkar: चक्क राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार! बाळा नांदगावकर यांनी का केली ही भविष्यवाणी?

Yavatmal Assembly Election : जिल्ह्यात फुटू शकतात बंडखोरीचे फटाके... दिग्रस, यवतमाळ, पुसद मतदारसंघावरून ओढाताण

FM Souza: हायकोर्टाने सांगितला कला आणि अश्लीलतेतील फरक; 'लव्हर्स' अन् 'न्यूड' कलाकृती नष्ट करण्यास दिला नकार

Diwali 2024 Reels and Video: 'दिन दिन दिवाळी..' फोटो अन् व्हिडिओसाठी वापरा 'हे' ट्रेंडी कॅप्शन इंस्टाग्रामवर पोस्ट करताच लाईक्स, व्हियूजचा होईल वर्षाव

Jalgaon Crime News : शाळकरी मुलीचे व्हिडिओ व्हायरल करून ‘ब्लॅकमेलिंग’! दोन संशयितांना अटक; मोबाईल जप्त

SCROLL FOR NEXT