Administration conduct campaign for out-of-school children implemented till July 15 sakal
अकोला

Akola : प्रशासन घेणार शाळाबाह्य मुलांचा शोध, गाव, वस्ती, तांड्यावर सर्वेक्षण; १५ जुलैपर्यंत राबविणार मोहिम

शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ५ ते २० जुलै या कालावधीत ३ ते १८ वयोगटांतील बालकांचे सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Akola News : शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ५ ते २० जुलै या कालावधीत ३ ते १८ वयोगटांतील बालकांचे सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे.

स्थलांतरित बालकांना त्यांच्याच परिसरात शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्यासाठी जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नुकत्याच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वेक्षण समितीच्या बैठकीत शाळाबाह्य मुलांच्या शोधासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या.

शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश देऊन त्यांचे गुणवत्तापूर्वक शिक्षण सुरू ठेवणे तसेच बालकांची गळती शून्यावर आणणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. महसूल, ग्रामविकास, नगर विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास कामगार विभाग, आदिवासी विकास विभाग,

अल्पसंख्याक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग या विभागातील अधिकाऱ्यांच्या सहभागाने शाहाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. बालकांना शाळाबाह्य होण्यापासून रोखण्यासाठी व्यापक स्वरूपात हे अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत शिक्षण संचालकांनी सुचविले आहे.

शाळेत न जाणारी व मधेच शाळा सोडणारी बालके तसेच विविध कारणांमुळे होणारे कामगार कुटुंबांचे स्थलांतर यामुळे ३ ते १८ या वयोगटातील अनेक बालके शाळाबाह्य होत असतात. तसेच जिल्ह्यात वीट भट्टी कामगारांची संख्या मोठी आहे. त्यांच्या पाल्यांना मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी हे सर्वेक्षण आहे.

गतवर्षी केवळ ५४ शाळाबाह्य मुले

शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला व डिसेंबर महिन्यात शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी मोहिम राबविण्यात येते. गतवर्षी अकोला जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या सर्वेक्षणात ५४ मुले शाळाबाह्य आढळली होती. या मुलांचा शाळेत प्रवेश करण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

शाळाबाह्य बालकांचा शोध घेण्यासाठी ५ जुलै ते २० जुलैदरम्यान मोहिम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण स्तरावरील समितीने प्रत्येक घरी जाऊन आढळलेल्या प्रत्येक बालकाला शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी पालक व गावकऱ्यांच्या सहभागाने विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

-रतनसिंग पवार, शिक्षणाधिकारी (प्राथ.), अकोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT