Admission to RTE schools Akola Selection 1,920 students private convent sakal
अकोला

अकोला : मोफत प्रवेशासाठी १,९२० विद्यार्थ्यांची निवड

लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा संबंधितांना १९ एप्रिलपर्यंत खासगी कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेता येईल

सकाळ वृत्तसेवा

अकोला : आरटीईअंतर्गत खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या पालकांच्या पाल्यांच्या अर्जांची सोडत सोमवारी शासन स्तरावरून करण्यात आली. त्यानुसार अर्ज करणाऱ्या ६ हजार ३ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ९२० विद्यार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात आली आहे.

लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधितांना १९ एप्रिलपर्यंत खासगी कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेता येईल. दरम्यान सोमवारी सोडतीच्या दिवशी संकेतस्थळ तांत्रिक अडचणीमुळे बंद झाले होते. परंतु आता ते पूर्ववत सुरू झाले आहे. त्यामुळे लॉटरी लागलेल्या पालकांची डोकेदुखी कमी झाली आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (आरटीई) समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पालक जास्त प्रवेश शुल्क असलेल्या शाळांमधून आपल्या मुलांना शिकवू शकत नव्हते; मात्र आरटीईमुळे अशा पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे.

दरम्यान यंदा आरटीई कोट्यातून प्रवेश मिळावा, यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पालकांना अर्ज करण्याची शेवटची संधी १० मार्चपर्यंत देण्यात आली होती. दरम्यान प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्यांची निवड शासन स्तरावरून लॉटरी पद्धतीने करण्यात आली आहे. लॉटरी लागलेले पालक त्यांच्या पाल्याचा खासगी शाळेत १९ एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चित करू शकतील.

अशी आहे

  • आरटीईची स्थिती

  • नोंदणीकृत शाळा १९६

  • आरक्षित जागा १९९५

  • प्राप्त अर्ज ६००३

  • जास्त प्राप्त अर्ज ४००७

  • लॉटरी लागलेले १९२०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT