अकोला : जिल्ह्यात कुष्ठ व क्षयरुग्णांचा शोध घेण्यासाठी १३ ते ३० सप्टेंबरपर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान आरोग्य विभागांच्या पथकांनी गृहभेटी देवून १२३ नव्या क्षयरुग्णांचा शोध लावला. संबंधित नव्या रुग्णांवर आता आरोग्य विभागाच्या देखरेखीत उपचार करण्यात येत आहेत.
समाजातील क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेवून निदान निश्चिती करून औषोधोपचार सुरु करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यासाठी जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहीम १३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात आली. मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील तब्बल दोन लाख ७६ हजार घरांना भेटी देवून कुष्ठ व क्षयरुग्णांना शोध घेण्यात आला. त्यासाठी ग्रामीण व शहरी भागात सर्व्हेक्षण सुद्धा करण्यात आले. दोन लाख ७६ हजार घरांना भेटी देवून शहरी व ग्रामीण भागातील एकूण १३ लाख ८३ हजार लोकांच्या सर्व्हेव्दारे कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्यात आला. त्यासाठी एक हजार ४२ चमूंची नियुक्ती करण्यात आली होती.
सदर चमूंनी शहरी व ग्रामीण भागात पाहणी केली व त्याद्वारे नव्या १२३ क्षयरुग्णांना शोधण्यात आरोग्य विभागाला यश मिळाले. सदर रुग्णांवर आता निक्षय मित्र व आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत वैद्यकीय उपचार करण्यात येत आहे.
जिल्ह्यात १३ ते ३० सप्टेंबर दरम्यान क्षयरुग्ण तपासणीची मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत १२३ नवे क्षयरोगी आढळले. सदर रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले आहेत.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा क्षयरोग अधिकारी, अकोला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.