अकोला : भारताची आर्थिक राजधानी असलेल्या राज्यात शेतकरी आत्महत्या करतात, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. त्यासाठी शेती विकासाला प्राध्यान्य देण्याची आवश्यकता आहे. केवळ पारंपरिक पिकांवर अलवलंबून न राहत निर्यात करणाऱ्या शेती पिकांच्या दिशेने काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी गुरुवारी (ता.७) अकोला येथे केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या सारंभाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मथुरा येथील पंडित दीनदयाल उपाध्याय पशुचिकित्सा विज्ञान विश्वविद्यालय व डॉ. पंदेकृवि अकोल्याचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉ. एम.एल. मदान, कुलगुरू डॉ. विलास भाले यांची उपस्थिती होती. राज्यपालांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शेतीमध्ये नवीन उपक्रम राबवून शेतीचा विकास घडविण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शेतीसाठी माती हा महत्त्वाचा घटक आहे.
त्यामुळे मातीचा पोत कसा वाढेल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्यावरही त्यांनी भर दिला. महाराष्ट्राच्या इतर भागातील शेतकरी निर्यातक्षम शेती उत्पादन घेवून भरघोष उत्पन्न घेत आहेत. विदर्भातील व विशेषतः अकोल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निर्यातक्षम शेती उत्पदन घ्यावे. त्यासाठी कृषी विद्यापीठाने त्या दिशेने काम करण्याचा सल्लाही राज्यपालांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल्या प्रमाणे शेतकऱ्यांनी ऊर्जादाता होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहनही राजपालांनी केले. किसान रेल व समृद्धी महामार्गाच्या निर्मितीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे उत्पादन देशाच्या कानाकोपऱ्यात जलतगतीने पोहोचविणे शक्य होणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा विकासाला गती देणारा महामार्ग ठरणार असल्याचे राज्यपाल म्हणाले. जलयुक्त शिवार या योजनेचेही राज्यपालांनी कौतुक केले. नाव लहान असले तरी ही योजना फार उपयुक्त असल्याचे ते म्हणाले.
कृषी विद्यापीठाला इंधन निर्मितीचा सल्ला
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी बहाल केली. त्याला उत्तर देताना ना. गडकरी यांनी तंत्रस्नेही होत कृषी विद्यापीठांनी ग्रीन हायड्रोजन निर्मितीवर भर देण्याचा सल्ला दिला. विद्यापीठांच्या इमारतींवर सौर ऊर्जा पॅनल बसवून व विद्यापीठ परिसरातील पाण्याची वापर करून ऊर्जा निर्मितीवर भर देता येईल, असे गडकरी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनाही त्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे होण्याचा सल्ला दिला. शेती विकासात कृषी पदवी व पदविका मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची भूमिका येणाऱ्या काळात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे ते म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.