santra  sakal
अकोला

Akola agriculture : पावसाच्या खंडाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली

खरीपातील पिकासोबतच संत्रा उत्पादक शेतकरी संकटात

सकाळ वृत्तसेवा

बोर्डी - अकोट तालुक्यात पावसाचा खंड पडल्याने पिकांच्या उत्पादनात मोठा फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामध्ये सध्या संत्रा पिकांवर तुटण्याच्या अवस्थेत असलेला आंबिया बहार आणि मृग बहारला पावसाच्या खंडाचा जबर फटका बसताना दिसत आहे. संत्रा फळ जमिनीवर गळत असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

सोयाबीन पिकाला फुलोरा अवस्थेत पावसाची मोठ्या प्रमाणात गरज असते. कपाशीला सुद्धा फूलपाती धरत असून, पावसाच्या खंडामुळे त्याची सुद्धा गळण होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. परिसरात पावसाने मोठी उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या भोवती चिंतेचे ढग वाढत आहेत.

पावसाळा जवळपास अर्धा होत आला. एकीकडे पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत, सरासरी पावसाच्या तुलनेत तालुक्यात अनेक महसूल मंडळांमध्ये बराच खंड पडला असून, पीक विमा लागू व्हावा, अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करीत आहेत.

ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी स्पिंक्लर ड्रीप, तर काही दांडपाण्याने पाणी देऊन पिकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या सोयाबीनचे पीक फुलोरावस्थेत आहे. काही ठिकाणी शेंगा धरण्याची प्रक्रियाही होत आहे

अशातच पावसाच्या खंडाचा परिणाम सोयाबीन पिकासह कापसाला सध्या अधिक होऊ शकतो. तसेच कपाशीच्या क्षेत्रातही उत्पादन घटीची शक्यता आहे.

आता पीक चांगले दिसत असले तरीही त्याचा उत्पन्नावर पर्यायाने उत्पादनावर परिणाम होणार आहे.

परंतु, कोरडवाहू क्षेत्रात बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक हातातून जाण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. एक-दोन दिवसात पाऊस न आल्यास उत्पादन घटण्याची दाट शक्यता आहे.

मीड सीजनचे सर्व्हे चालू आहेत. इतर ठिकाणी सुद्धा पावसाचा खंड असेल तिथे सुद्धा सर्व्हे केले जातील.

- शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.

अकोट तालुक्यातील अकोट, अकोलखेड, मुंडगाव, पणज, चोहोट्टा बाजार, कुटासा, उमरा, आसेगाव हे महसूल मंडळ मीड सीजनच्या सर्व्हेकरिता लागू झाले असून, लवकरच त्याठिकाणी सर्व्हे करण्यात येतील.

- सुनील चव्हाण, तहसीलदार, अकोट.

दुष्काळ ओला असो की, कोरडा सरकारने शेतकऱ्यांना नुसताच आर्थिक मदत व्हावी म्हणून दुष्काळाची घोषणा करू नये, तर कृषीप्रधान देशाला शोभेल अशा व दुरगामी परिणाम करणाऱ्या उपाय-योजना कराव्या. तसेच शेतकऱ्यांनी सुद्धा भविष्यात अशा नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी शेती पद्धतीत बदल करावा.

- शशिकांत गयधर, शेतकरी, बोर्डी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT