Akola Amravati National Highway Construction start sakal
अकोला

अकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीला प्रारंभ

पाच दिवसांत विक्रमी ७५ कि.मी.चे उद्दिष्ट; अमरावती-अकोला प्रवास होणार सुखकर

सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जगातील सर्वात लांब व अखंड रस्त्याच्या निर्मिती कार्याला शुक्रवारी प्ररंभ झाला.विश्वविक्रमी उपक्रमाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (पूर्वीचा सहा) वरील अमरावती जिल्ह्यातील लोणी येथून कामाला सुरवात झाली असून मूर्तिजापूरपर्यंत एका बाजूच्या दोन लेनमधील चौपदरीकरणाचे काम पुढील मंगळवार पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

राज पथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड या पुण्यातील कंपनीने हा प्रकल्प हाती घेतला आहे.रस्त्यांच्या कामाचा दर्जा राखण्यासाठी सुसज्ज दर्जा नियंत्रण प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. वापरल्या जाणारे बांधकाम साहित्य आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या निर्धारित दर्जाप्रमाणेच हे काम होईल,आशी ग्वाही यावेळी कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.हा धाडसी प्रयत्न ''गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड''च्या संपूर्ण नियमानुसार होणार आहे. तसेच नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडिया (NHAI) द्वारे हा प्रकल्प करारानुसार त्यांच्या देखरेखीत पूर्ण केला जाईल. तज्ज्ञ चमूचे कामावर लक्ष आहे.

रस्तानिर्माण कामाच्या प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. प्रकल्प व्यवस्थापक, हायवे इंजिनिअर, क्लालिटी इंजिनिअर, सर्व्हेअर, सेफ्टी इंजिनिअरसह इतरांची चमू तैनात आहे. माना कॅम्प येथे व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम उभारण्यात आली आहे. त्यात ४ हॉट मिक्सप्लांट, ४ व्हीललोडर, १ पेव्हर, १ मोबाईल फिडर, ६ टँडेम रोलर, १०६ हायवा, २ न्युमॅटीक टायर रोलर आदी यंत्रसामग्रीसह ७२८ मनुष्यबळ कार्यरत आहे. यंत्रसामग्री सतत कार्यरत आणि दोषमुक्त ठेवण्यासाठी, टाटा मोटर्सचे ५ इंजिनिअर आणि अन्य ५ अधिकारी तैनात आहेत.अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून, रस्ता निर्मितीचा हा विक्रम करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.

सार्वजनिक कार्य प्राधिकरण-अश्गुल यांनी दोहा, कतार येथे यापूर्वी विक्रम नोंदविला होता. सुमारे २४२ तास म्हणजेच १० दिवस नॉनस्टॉप बांधकाम करून २५ किलोमीटर रस्ता निर्मितीचा विक्रम केला होता. आता तो विक्रम मोडण्याचा राजपथने चंग बांधला आहे. पंतप्रधान, नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सक्षम आणि गतिमान नेतृत्वात सुरु झालेल्या ‘गती-शक्ती’ प्रकल्पांतर्गत लोक, वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीसाठी एकात्मिक आणि अखंडित मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी प्राप्त करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

  • जगातील सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मिती.

  • ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये होणार नोंद.

  • लोणी ते मूर्तिजापूरपर्यंत सतत पाच दिवस चालणार काम.

  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जय्यत तयारी.

सतत ११० तास रात्रंदिवस काम करून पूर्णत्वास जाणाऱ्या या प्रकल्पातील कामाची गुणवत्ता निरंतर तपासली जाईल. कामाचे मायक्रोप्लॕनिंग झाले असून पूर्णत्वास गेल्यानंतर हा देशातील असा पहिला प्रकल्प असेल.

-राजीव अग्रवाल, क्षेत्रीय अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.

या उपक्रमासाठी २-३ महिन्यांपासून तयारी सुरू आहे. ४ महिन्यांपासून ''गिनीज''शी चर्चा सुरू आहे. यापूर्वीचा विक्रम कतार मधील आहे. सध्या ''गिनीज''चे लोक हजर आहेत. काही लंडन वरून येत आहेत. शिवधनुष्य पेलणार.

-जगदीश कदम, व्यवस्थापकीय संचालक, राजपथ इन्फ्राकॉन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT