Animal stealing sakal
अकोला

अकोला : जनावरे चोरणारी टोळी जेरबंद

एका कारसह एकूण १३ लाख एक हाजारांचा मुददेमाल जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : गोवंश जनावर गाय, बैल, बकरी इ पाळीव प्राण्याची कारचा वापर करून चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. एका कारसह एकूण १३ लाख एक हाजारांचा मुददेमाल जप्त केला.

गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्याकडे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सोपविला होती. त्यानुसार तपास करताना कारचा वापर करून गोवंश चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाली. त्यावरून मोहम्मद फईम मोहम्मद जमील (२८, रा.मंगळवारा,कोतवालीचा मागे), अजमद शाह रहेमत शाह (२२, रा.इंदीरानगर अकोट फैल), सैयद रिजवान उर्फ अन्वर सैयद अशरफ (२२, रा.युसुफ अली खदान) आ आरोपीला ताब्यात घेतले.

गुन्ह्यात वापरलेल्या एम.एम.१४ सी.एक्स. ६००५, एम.एच.०४ जी.डी.३७९९ आणि एम.एच.०४ सी.एक्स.२१३६ या तीन कार जप्त केल्यात. यासोबतच रोख रकमेसह एकूण १३ लाख एक हजार रुपयांचा मुददेमाल जप्त केला. बोरगाव मंजू, बार्शीटाकळी, सिव्हिल लाईन्स आणि उरळ पोलिस स्टेशन येथे दाखल असलेले पाच गुन्हे उघडकीस आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि.गोपाल जाधव, पोलिस अंमलदार नितीन ठाकरे, गोकुळ चव्हाण, स्वप्निल खेडकर, लिलाधर खंडारे, शेख अन्सार, सुमीत राठोड, पवन यादव, जोत्स्ना लव्हाळे, अक्षय बोबडे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT