घाटबोरी (जि.बुलडाणा) : आईच्या प्रेमाची तुलना कुणाशीच करता येत नाही. स्वत:च्या पोटाला चिमटा काढून मुलांचे पोट भरणार्या आईचे ऋण केव्हाच फेडता येऊ शकत नाही.
मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथील श्रीमती अन्नपूर्णाबाई काशिनाथ आप्पा काचेवार या गणेश काशिनाथ आप्पा काचेवार वय 47 वर्ष यांचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर मुलासाठी जगाचा निरोप घेते.
अल्पभूधारक शेतकरी गणेश काशीनाथआप्पा काचेवार हे 12 जानेवारीला दिवसभर शेतात तुरीची सोंगनी करून घरी आले. संध्याकाळी अचानक छाती दुःखत असल्याने मेहकर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु, त्यांची परिस्थिती अधिक खालावली आणि उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 13 जानेवारीला गणेश यांच्यावर जड अंतःकरणाने कुटुंबासह आपली आई अंत्यसंस्कार करून घरी येते.
आई श्रीमती अन्नपूर्णाबाई काशिनाथ आप्पा काचेवारला चक्कराच्या भोवळ येऊन खाली पडते. त्याच क्षणी आई अन्नपूर्णाबाईला मेहकरला रुग्णालयात दाखल करण्यात येते.
परंतु, डॉक्टरांनी रक्तदाब कमी जास्त होत असल्याच्या कारणावरून औरंगाबाद येथे नेण्याचा सल्ला देण्यात आला. तातडीने औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
परंतु, तेथे अन्नपूर्णाबाई हृदयविकाराचा झटका आल्याने मुलगा गणेश पाठोपाठ जगाचा निरोप घेतला. अशा हृदयस्पर्शी घटनेमुळे घाटबोरी गावात शोककळा पसरली. सायंकाळी मकरसंक्रांतीच्या दिवशी मोठ्या जड अंतःकरणाने अन्नपूर्णाबाईवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
(संपादन - विवेक मेतकर)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.