अकोला

Akola: सचिन कलंत्रेंची बदली रद्द करा, महाबीजच्या संचालकांसह भागधारकांची मागणी

Mahabij Latest update: महाराष्ट्र शासनाद्वारे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांची बदली करण्यात आली आहे

सकाळ वृत्तसेवा

latest Akola Transfer Update: : सद्यस्थितीत महाराष्ट्रात खरीप हंगाम २०२४ सुरु असुन, कुठे पेरणी झाली आहे तर कुठे पेरणीची लगबग सुरू आहे तर कुठे पावसाअभावी दुबार पेरणीची शक्यता आहे. अशा अस्थिर परिस्थितीमध्ये महाबीजद्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर बियाणे पुरवठा करणे सुरू असून, अशा संवेदनशील परिस्थितीत महाराष्ट्र शासनाद्वारे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांची बदली करण्यात आली आहे.

महाबीजसारख्या संस्थेला एक जबाबदार तथा स्थिर अधिकारी कार्यरत असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांची बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी महाबीजच्या संचालकांसह भागधारकांनी शासनाकडे केली आहे. याची माहिती महाबीज कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संचालकांनी दिली.

सचिन कलंत्रे (भाप्रसे) हे महामंडळाच्या आस्थापनेवर १६ डिसेंबर, २०२२ रोजी रुजू झाल्यापासुन महामंडळाचे कामकाज अतिशय चांगल्या पध्दतीने सुरू होते. कलंत्रे यांना महाबीजमध्ये रुजू होवुन फक्त १.५ वर्षाचा कालावधी झाला असुन, बदलीसाठी उर्वरित १.५ वर्षाचा कालावधी बाकी असतांना त्यांची शासनाकडुन अचानक बदली करण्यात आली. महाबीजमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणुन यायला अधिकारी इच्छुक नसतात व रुजू झाले तर पुर्णकाळ टिकत नाहीत त्यामुळे त्याचा परिणाम महाबीजच्या कामकाजावर होतो.

ऐन खरीप हंगाम सुरू असतांना महाबीजला नवीन व्यवस्थापकीय संचालक देण्यात आले तर नवीन येणाऱ्या अधिकाऱ्याला महाबीजचे कामकाज कशा पध्दतीने चालते याविषयी समजायला बराच कालावधी लागेल. अशा परिस्थितीमध्ये महाबीजच्या संपूर्ण कामकाजावर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अहोरात्र काम करणाऱ्या महाबीज या राज्यस्तरीय संस्थेपेक्षा एका शहराची महानगरपालीका शासनासाठी महत्वाची असु शकते का? अशा प्रश्न शेतकरी तथा महाबीज बिजोत्पादकांमध्ये निर्माण झाला आहे.

कृषी विभागाकडे शासनाने गांभिर्याने पाहणे आवश्यक असुन, कलंत्रे यांची महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन झालेली बदली रद्द करण्यात यावी अशी महाराष्ट्रातील तमाम शेतकरी वर्ग तसेच महाबीज बिजोत्पादकांच्या वतीने करण्यात आली. या पत्रपरिषदेला महाबीजचे संचालक डॉ. रणजीत सपकाळ, वल्लभराव देशमुख, भागधारक शेतकरी प्रकाश काकड, हेमंत देशमुख, नंदकिशोर बढे, हरिभाऊ येवले, विकास डाळिंबकर, भास्कर कदम, सुनिल निवाणे, चंद्रकांत क्षीरसागर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT