Akola Lok Sabha Election Result 2024 : अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी झाले आहेत. त्यांना काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांनी चांगली झुंज दिली. इथं वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांचा प्रभाव काही दिसू शकला नाही.
अकोला मतदारसंघातून भाजपनं विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रंना उमेदवारी दिली होती. पण ही भाजपची घराणेशाही असल्याचा आरोप मतदारांनीच खुद्द केला होता. तर दुसरीकडं काँग्रेसनं यंदा मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात न उतरवता उच्चशिक्षित डॉ. अभय पाटील या कुणबी उमेदवाराला संधी दिली. पण तरीही मतदारांनी अनुप धोत्रे यांना पसंती दर्शवली.
अकोला लोकसभा मतदारसंघात यंदा ६१.७९ टक्के मतदान पार पडलं. २०१९ च्या तुलनेत यंदाच्या मतदानात दोन टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालं आहे. तर अकोला पश्चिम मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं. शहरीच्या तुलनेत अकोला लोकसभेसाठी ग्रामीण भागात मतदान अधिक झालं आहे.
संजय धोत्रे (भाजप) विजयी मते : ५,५४,४४४
ॲड. प्रकाश आंबेडकर (वंचित) मते : २,७८,८४८
हिदायत पटेल (काँग्रेस) मते : २,५४,३७०
भाई कांबळे (बसप) मते : ७,७८०
विजयी उमेदवारांचे मताधिक्य : २,७५,५९६
एमआयडीसी व ग्रामीण भागातील विकासकामांचा प्रश्न
अकोट-अकोला रखडलेल्या रस्त्यामुळं नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी.
अपुऱ्या सिंचनाच्या सुविधांमुळं शेतकरी नाराज
तसेच अकोट तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
अकोला येथील महानगरपालिका हद्दवाढीमधील विकास
बेरोजगारी आणि वाढती गुन्हेगारी
अकोला पूर्व - ५९.३६ टक्के
अकोला पश्चिम - ५४.८८ टक्के
अकोट - ६४.०२ टक्के
बाळापूर - ६६.५८ टक्के
मुर्तीजापूर - ६४.५२ टक्के
रिसोड - ६२.४३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.