pola sakal
अकोला

वाटीवर वाटी, वाटीत रवा... कोरोनाले घेऊन जाय महादेवा !

ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती असली तरी कोरोनामुळे पोळा भरत नसल्याने शेतकऱ्यांच्या या कलागुणांवर पाणी फिरले आहे.

सकाळ वृत्तसेवा

बाळापूर (जि. अकोला) : ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती असली तरी कोरोनामुळे पोळा भरत नसल्याने शेतकऱ्यांच्या या कलागुणांवर पाणी फिरले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांवर ‘वाटीवर वाटी, वाटीत ठेवला रवा... अन् या कोरोनाले घेऊन जाय महादेवा...! अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

‘आज अवतन घ्या, अन् उद्या जेवायला या’ अशा प्रकारचे आमंत्रण पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना दिले जाते. मात्र कोरोनामुळे दोन वर्षापासून बैलांना जेवणाचे अवतनच न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. बैलांचा शृंगार करून त्यांची मिरवणूक काढून कृषी संस्कृतीचे दर्शन घडविणारा पोळा सण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण समजला जातो.

पोळ्याच्या आदल्या दिवशी शेतकरी तूप किंवा तेल आणि हळद लावून बैलाचे खांदे शेकतात. ‘आज अवतन घ्या, अन् उद्या जेवायला या’ अशा प्रकारचे आमंत्रण पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना दिले जाते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी प्रमाणे यंदाही वृषभराजांना जेवणाचे आमंत्रणच मिळाले नाही.

ग्रामीण भागात बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांचा सर्वांत मोठा सण पोळा साजरा करण्यात येतो. पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. तळ्यावर किंवा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.

पोळा नसला तरी बैलांचा शृगांर होणारच!

जिल्हा प्रशासनाने सरकारच्या आदेशानुसार कोरोना संकटात बैल पोळा भरविण्यास मनाई केली आहे. त्यामुळे गावागावांत भरणारा पोळा सलग दुसऱ्या वर्षी भरताना दिसणार नाही. मात्र, शेतकऱ्यांना वर्षभर साथ देणाऱ्या वृषभ राजाला पोळ्याच्या दिवशी शृंगार न करता ठेवणे शेतकऱ्यांचा पचनी पडणारे नाही. त्यामुळे अधिकृतपणे पोळा भरणार नसला तरी शेतकऱ्यांना बैलांचा सजविण्याची संपूर्ण तयारी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: जळगावमधील उमेदवार गिरीश महाजन यांनीही केलं मतदान

Voting Percentage: दुपारी १ वाजेपर्यंतची आकडेवारी समोर; महाराष्ट्र की झारखंड, मतदानात कोण ठरला मोठा भाऊ?

Adani Group: अदानी समूह देणार रिलायन्सच्या जिओ वर्ल्ड सेंटरला टक्कर; मुंबईत उभारणार सर्वात मोठे कन्व्हेन्शन सेंटर

Assembly Election Voting 2024: ऐन मतदानाच्या दिवशी महाविकास आघाडीत फूट, उद्धव ठाकरेंना टेन्शन...काँग्रेसने भूमिका बदलली?

गोड पण गूढ पण! प्रसाद ओक, स्वप्निल जोशी आणि शिवानी सुर्वेच्या '‘जिलबी’चा पोस्टर रिलीज; 'या' दिवशी येतेय भेटीला

SCROLL FOR NEXT