अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आणखी २७ विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे जीएमसीतील पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांचा आकडा ५२ वर गेला आहे. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे सर्वच वर्ग बंद करण्यात आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील १८ विद्यार्थी पॉझिटिव्ह आले होते. असे असतानाही महाविद्यालयातर्फे अभ्यासवर्ग सुरूच ठेवण्यात आले. दुसऱ्याच दिवशी आणखी सात रुग्ण पॉझिटिव्ह आले.
मंगळवारी रात्री करण्यात आलेल्या चाचणी आणखी २७ विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाविद्यालय प्रशासनातर्फे अभ्यासवर्ग बंद करण्यात आले. या सर्व रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन ?
सर्वच विद्यार्थीचा प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. महाविद्यालयातील ५२ विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याने आता दर चार दिवसांनी विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा
संपादन - विवेक मेतकर
अधिक वाचा -
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.