अकोला : कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यात रविवार (ता. २८) पर्यंत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यामधील इयत्ता पाचवी ते नववीपर्यंत असलेल्या सर्व शाळा तसेच सर्व महाविद्यालये, सर्व प्रकारची खासगी शैक्षणिक प्रशिक्षण केन्द्रे, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. त्यासोबतच पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे.
राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे आपत्कालीन उपाययोजना करणे आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी यांना प्राप्त अधिकारान्वये २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता सदर आदेश जारी केले आहेत. त्याअतंरगत अकोला शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता संचारबंदीचे आदेश पारीत करण्यात आले असून त्यानुसार शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे.
सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका यासाठी केवळ ५० व्यक्तीनाच परवानगी असेल. मिरवणूक व रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. या बाबत स्थानिक प्रशासन व पोलिस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. हॉटेल, पानटपरी, चहाची टपरी, चौपाटी इत्यादी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे बंधनकारक राहिल. जिल्ह्यातील सर्व धार्मिक संस्था, प्रार्थना स्थळे यांनी त्यांच्या धार्मिक संस्थानामध्ये, कार्यक्रमामंध्ये गर्दी होणार नाही या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर बंधनकारक राहिल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - शेतकरी नेते राकेश टीकैत शनिवारी अकोल्यात, संयुक्त किसान मोर्चा फुंकणार आंदोलनाचे बिगुल
लग्नासाठी ५० जणांनाच परवानगी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात लग्न समारंभाकरिता केवळ ५० व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. लग्न समारंभाकरिता रात्री १० वाजेपर्यंतच परवानगी अनुज्ञेय असेल. या बाबत स्थानिक प्रशासन व पोलिस विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी. लग्न समारंभाच्या नियोजित स्थळा व्यतिरीक्त इतर ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.
अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा
संपादन - विवेक मेतकर
अधिक वाचा -
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.